एक्स्प्लोर

Ajit Pawar Plane Crash:अजित पवारांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना सांत्वनपर फोन, अंत्यसंस्कारालाही राहणार उपस्थित

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झाल्यामुळे शरद पवारांसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

PM Modi Call to Sharad Pawar on Ajit Pawar plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं आहे . जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये येत असताना विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर सर्वच स्तरांमधून हळहळ व्यक्त केले जात आहे. दरम्यान नवी दिल्लीत असलेल्या शरद पवारांनी थेट बारामती गाठत हेलिकॉप्टरमधून उतरताच हा अपघात कसा झाला? याची माहिती घेतली.अजित पवारांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. अजितदादांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांना सांत्वनपर फोन करत आपल्या संवेदना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उद्या अजित दादांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित राहणार आहेत. (Ajit Pawar Plane Crash)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झाल्यामुळे शरद पवारांसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अजितदादा आपल्यात नाहीत हे पचवणं अनेकांना कठीण जात आहे. राजकीय वर्तुळातून सर्वच जण पवार कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना सांत्वनपर फोन केला आहे. अजित दादांच्या निधनाने पवार कुटुंबीयांमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) आपल्या संवेदना व्यक्त केल्या. उद्या अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात सकाळी 11 वाजता अजित पवारांवर अंत्यसंस्कार केले जाणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित पवारांना श्रद्धांजली

अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे .एक्स पोस्ट करून त्यांनी अजित पवार यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद असल्याचे म्हटलं.

ते म्हणाले,"अजित पवार हे जनतेचे नेते होते.त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते.महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे.प्रशासकीय बाबीं बद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे .त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो .ओम शांती "

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget