एक्स्प्लोर

Ajit Pawar Oath as Deputy Chief Minister : मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक... सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ!

Ajit Pawar Oath as Deputy Chief Minister of Maharashtra : अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आज सहाव्यांदा शपथ घेतलीये.

Ajit Pawar Oath as Deputy Chief Minister of Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज (दि.12) सहाव्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडतोय. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतलीये. तर एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे या अजित पवार यांनी  महाराष्ट्राचे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होण्याची विक्रम केला आहे. महायुतीच्या शपथिविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राज्यांचे प्रमुख देखील उपस्थित होते. याशिवाय, अनेक सेलिब्रिटींनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली. 

अजित पवारांचा आजपर्यंतचा प्रवास 

बारामती विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त.
 
सदस्य वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्था, पुणे 

रयत शिक्षण संस्था, सातारा संचालक

महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष – ऑगस्ट 2006 ते 19 ऑगस्ट 2018. 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष – सप्टेंबर 2006 पासून 

 महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन – मार्च 2013 पासून

सेवादास संचालक : महानंद आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन - सप्टेंबर 2005 ते मार्च 2013 आणि 25 नोव्हेंबर 2018 पासून अध्यक्ष म्हणून काम करत आहे

पूर्वीच्या विधानसभा / विधानपरिषद / लोकसभा / राज्यसभेचे सदस्य आणि संसद सदस्य / समिती प्रमुख म्हणून केलेले काम (कार्यकाळात)
लोकसभा सदस्य : जून 1991 ते सप्टेंबर 1991

विधानसभा सदस्य : 1991 ते 1995, 1995 ते 1999, 1999 ते 2004, 2004 ते 2009, 2009 ते सप्टेंबर 2014, 2014 ते 26 सप्टेंबर 2019. २०१९ ते २०२४ 

राज्य/केंद्रीय मंत्री/राज्यमंत्री म्हणून केलेले काम (कार्यकाळात)

कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री: जून 1991 ते नोव्हेंबर 1992

पाणीपुरवठा, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री: नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993

पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे), फलोत्पादन : ऑक्टोबर 1999 ते जुलै 2004

ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ): जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४

जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे पाटबंधारे वगळून), जलसंपदा आणि स्वच्छता :  नोव्हेंबर २००४ ते नोव्हेंबर २००९.

जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे वगळून), ऊर्जा : नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१०

उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012

उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): डिसेंबर 2012 ते सप्टेंबर 2014

उपमुख्यमंत्री : 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019

उपमुख्यमंत्री : 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022 

विरोधी पक्षनेते : ४ जुलै 2022 ते ३० जून 2023 

उपमुख्यमंत्री : २ जुलै 2023 ते 26 नोव्हेंबर 2024

अजित अनंतराव पवार यांचे प्रोफाइल

नाव : अजित अनंतराव पवार

जन्मतारीख:22 जुलै 1959

जन्मस्थान: देवळाली प्रवरा, राहुरी तालुका, अहमदनगर जिल्हा

शिक्षण: बी.कॉम

ज्ञात भाषा:  मराठी, हिंदी, इंग्रजी

व्यवसाय: शेती

पत्नीचे नाव: पत्नी - सौ.सुनेत्रा अजित पवार

मुले: २ 

मुलगे -  पार्थ आणि  जय

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शिवसेनेचे आमदार 'वर्षा'वर ठाण मांडून बसले, एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद घ्यायला राजी केलं; गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde oath ceremony: बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
Amruta Fadnavis : बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत : अमृता फडणवीस
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या खूप आनंद....
Eknath Shinde Deputy CM oath: नाथांचा नाथ एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, शिवसैनिक भारावले
लाडका भाऊ पुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sachin Tendulkar at Oath Ceremony : दादा-भाई-भाऊंचा शपथविधी, सचिन तेंडुलकर सपत्नीक उपस्थितGirish Mahajan Anant Ambani : महाजनाच्या पाठीत प्रेमाचा धपाटा, अनंत अंबानींनी नेमकं काय केलं?Amruta Fadnavis On Devendra Fadnavis Oath ceremony : देवेंद्र फडणवीस जिद्द आणि संघर्षामुळे आज पुन्हा मुख्यमंत्रीHanuman At Oath Ceremony : महायुतीच्या महाशपथविधीसाठी आझाद मैदानावर अवतरले हनुमान!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde oath ceremony: बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे?
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला
Amruta Fadnavis : बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत : अमृता फडणवीस
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या खूप आनंद....
Eknath Shinde Deputy CM oath: नाथांचा नाथ एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, शिवसैनिक भारावले
लाडका भाऊ पुन्हा
Bhanu Pania : फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
Oath Ceremony Seating Arrangement : महायुतीचा शपथविधी, सलमान - शाहरुखसाठी बाजूबाजूला खुर्ची
Oath Ceremony Seating Arrangement : महायुतीचा शपथविधी, सलमान - शाहरुखसाठी बाजूबाजूला खुर्ची
Embed widget