एक्स्प्लोर

Ajit Pawar : मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!

Ajit Pawar on Ram Shinde : कर्जत-जामखेड मतदारसंघात युतीचा धर्म पाळला गेला नाही. माझा बळी दिला गेला. पवार कुटुंबात अघोषित करार झाला होता, असे राम शिंदे यांनी म्हटले होते.

Ajit Pawar on Ram Shinde : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात (Karjat Jamkhed Vidhan Sabha Constituency) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार (Rohit Pawar) विरुद्ध भाजपचे राम शिंदे (Ram Shinde) यांच्या लढत झाली होती. या लढतीत रोहित पवार यांचा केवळ 1243 मतांनी विजय झाला होता. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी रोहित पवार यांना अजित पवारांनी (Ajit Pawar) माझी सभा झाली नाही, म्हणून वाचलास, असे म्हटले होते. यावरून राम शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. कर्जत-जामखेड मतदारसंघात युतीचा धर्म पाळला गेला नाही. माझा बळी दिला गेला. पवार कुटुंबात अघोषित करार झाला होता, असे त्यांनी म्हटले आहे. आता यावरून अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. 

राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी, यासंबंधीचा प्रस्ताव आज श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषद सभागृहात मांडला. या प्रस्तावाला विधान परिषदेच्या सदस्य मनीषा कायंदे तसेच अमोल मिटकरी, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. यानंतर आवाजी मतदानातून राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. यानंतर अजित पवारांनी केलेल्या भाषणाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. 

अजित पवारांची जोरदार फटकेबाजी

अजित पवार म्हणाले की, विधानसभेचे अध्यक्ष देखील तरुण आहेत तर परिषदेत देखील तरुण सभापती बसवले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्याबद्दल सांगितले. मात्र आपण अजूनही चाळीशीत आहात, असेच वाटत आहे. राम शिंदे सर तुम्ही म्हटलं होतं की, अजित पवारांनी माझ्या इथे सभा घेतली नाही. माझ्यामुळे आपला पराभव झाला. मात्र, जे झाले ते चांगलेच झालं, आपण आज सभापती झाला आहात, असे त्यांनी म्हटले. तसेच कदाचित आपण निवडून आला असता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, असे वाटले असते तर गिरीश महाजनांचे मंत्रिपद गेले असते. मात्र आता हे सर्व जाऊद्या, आज तुम्ही विधिमंडळात सर्वोच्च स्थानी आहात, अशी फटकेबाजी अजित पवारांनी केली. 

अजित पवारांचा गिरीश महाजनांना टोला

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सभापती राम शिंदे यांचे अभिनंदन करत होते. त्यावेळी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी काहीतरी वक्तव्य केले. यानंतर गिरीश आता तरी सुधर, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू, असे टोला अजित पवारांनी गिरीश महाजनांना लगावला. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर विधानपरिषदेत एकच हशा पिकल्याचे दिसून आले.   

आणखी वाचा 

कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Journalism Awards Mandar Gonjari:प्रतिनिधी मंदार गोंजारींना रामनाथ गोएंका एक्सलन्स जर्नलीझम पुरस्कारABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 March 2025Gadchiroli Honey Bee : मधमाशांशी फ्रेंडशिप, घरात 8-10 पोळं, मधमाशांसोबत राहणारं कुटुंबNagpur Rada Update : दंगलीत सहभागी होण्यासाठीच आले होते 'ते' 24 आरोपी दंगलग्रस्त भागातले नाहीच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...
60 वर्षाचा आमिर करणार तिसऱ्यांदा लग्न!
60 वर्षाचा आमिर करणार तिसऱ्यांदा लग्न!
Embed widget