एक्स्प्लोर

Suraj Chavan and Ajit Pawar: आधी तटकरेंनी दौऱ्यातून वगळलं, आता अजित पवारांनी सूरज चव्हाणांना तातडीने बोलावून घेतलं, लातूरच्या राड्यानंतर राष्ट्रवादीकडून डॅमेज कंट्रोल सुरु

Suraj Chavan and Ajit Pawar: सूरज चव्हाण यांनी आज सकाळीच कालच्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सुनील तटकरेंनी मोठा निर्णय घेतला. सूरज चव्हाणांना दौऱ्यातून वगळलं

NCP Suraj Chavan beaten Chhava Sanghatana Workers: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेने रविवारी लातूरमध्ये (Latur News) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर संताप व्यक्त केला होता. यावेळी 'छावा'च्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते उधळले होते. या प्रकारानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी 'छावा'च्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकार आणि राष्ट्र्वादी काँग्रेस पक्षावर टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसने डॅमेज कंट्रोल सुरु केले आहे.

कालच्या प्रकारानंतर सूरज चव्हाण यांनी आज सकाळी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत दिलगिरी व्यक्त केली. कालच्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी लवकरच विजय घाडगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या मनातील गैरसमज दूर करेन, असे सूरज चव्हाण यांनी म्हटले. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दौऱ्यातून सूरज चव्हाण यांना वगळल्याची माहिती समोर आली. सूरज चव्हाण यांच्या मारहाणीनंतर छावाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. याचा फटका सुनील तटकरे यांच्या दौऱ्याला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांनी खबरदारी म्हणून सूरज चव्हाण यांना आपल्या दौऱ्यातून वगळल्याची माहिती आहे. परंतु, सूरज चव्हाण यांच्याकडून, माझे बोट फ्रॅक्चर झाल्यामुळे आपण लातूरमध्ये राहून उपचार घेणार आहे, असे सांगण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कालच्या राड्यानंतर अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना तडकाफडकी मुंबईला बोलावून घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अजित पवार सूरज चव्हाण यांना नुसती समज देणार की त्यांच्यावर कारवाई करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Suraj Chavan: सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेकानंद पोलीस ठाण्याचे एक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या एक अश्या दोन पथके सूरज चव्हाण यांच्या शोधासाठी मार्गस्थ झाली आहेत.

आणखी वाचा

छातीत बुक्क्या मारल्याने अतीव वेदना, डोळ्यातून पाणी येतंय, समोरची व्यक्ती डबल दिसतेय; सूरज चव्हाणांनी बेदम मारलेला छावा संघटनेचा पदाधिकारी काय म्हणाला?

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget