NCP : फलटणच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्याची वारंवार मागणी, अजित पवार म्हणाले, कळतं का रे तुला, मलाच उमेदवारी मिळणार की नाही माहिती नाही...
Ramraje Naik Nimbalkar : रामराजे नाईक निंबाळकर यांनी अद्याप त्यांचा निर्णय जाहीर केलेला नाही. फलटण विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीसाठी सातारा जिल्ह्यातील फलटण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते दाखल झाले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत फलटणच्या जागेवर बौद्ध समजाला उमेदवारी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. फलटण विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी यापूर्वी दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तुतारी हाती घेण्यास सांगितलं आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचा अंतिम निर्णय झालेला नाही, त्यापूर्वीच फलटण कोरेगावातील कार्यकर्ते अजित पवार यांच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी महायुतीचं जागा वाटप झाल्यानंतर निर्णय होईल, असं अजित पवार म्हणाले. यावेळी ते कार्यकर्त्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी या मागणीसाठी फलटण, कोरेगाव मतदारसंघातील बौद्ध समाजाचे बांधव अजित पवारांना भेटले. खरंतर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना घोषित केली आहे. परंतु, रामराजे तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा मुळे बौद्ध समाजाचे बांधव उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीत भेटले आणि उमेदवारीची मागणी केली. कोणती जागा कोणाला सुटणार आहे हे अद्याप निश्चित नाही. ज्यावेळेस ही जागा महायुतीला कुणाला सुटते यावरती निर्णय घेऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
अजित पवार कार्यकर्त्यावर संतापले
कुठल्या कुठल्या जागा कुणाला जातात हे ठरु द्या, काही जागा शिवसेनेला जाणार आहे, काही जागा भाजपला जाणार आहेत, काही जागा मित्रपक्षाला जाणार आहेत, असं अजित पवार म्हणाले. जागावाटपापूर्वी मी तुम्हाला काही तरी सांगायचं, जागाच जर आमच्याकडे नसली तर मी तुम्हाला काय सांगणार, जागा वाटपाबाबत निर्णय झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या जागांबाबत निर्णय घेईन, असं अजित पवार म्हणाले, यानंतर पुन्हा कार्यकर्त्यानं मागणी केल्यानं अजित पवार संतापले. कळतं का रे तुला काही, मला उमेदवारी मिळणार आहे की नाही मंत्री असून असं अजित पवार म्हणाले.
रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांची भेट घेणार
रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भातील निर्णय फलटणला मेळावा घेऊन घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यापूर्वी फलटणमध्ये कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायासंदर्भातील गोष्टी अजित पवारांना सांगणार असल्याचं म्हटलं होतं. रामराजे नाईक निंबाळकर लवकरच अजित पवारांची भेट घेतील.
इतर बातम्या :