एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Haryana Elections Results 2024: हरियाणाचा खेळ संपलेला नाही, साडेतीन वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रांवर थांबा; भाजप माईंड गेम खेळतंय; काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा खळबळजनक आरोप

Haryana Vidhan Sabha Election Result 2024: हरियाणात भाजप सध्या 48 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

नवी दिल्ली: हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मंगळवारी पार पडत असलेल्या मतमोजणीत अनेक ट्विस्ट येताना दिसत आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात पार 'झोपलेला' भाजप आता बहुमताच्या जवळ येऊन पोहोचला आहे. त्यामुळे हरियाणात (Haryana Elections Results 2024) भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मात्र, या सगळ्या घडामोडी सुरु असताना काँग्रेस पक्षाचे (Congress) ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोग (Election Commission) मतमोजणीची ताजी आकडेवारी अपडेट करत नसल्यामुळेच भाजप (BJP) सध्या आघाडीवर दिसत आहे. हा भाजपचा माईंड गेम आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये, असे जयराम रमेश यांनी म्हटले.  

आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आम्ही आता त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. आतापर्यंत मतमोजणीच्या 11 ते 12 फेऱ्या पार पडल्या आहेत. पण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चौथ्या आणि पाचव्या फेरीचे निकाल दाखवले जात आहेत. त्यामुळे भाजप आघाडीवर दिसत आहे. हा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रकार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी हाच प्रकार घडला होता. निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम केले पाहिजे.  स्थानिक यंत्रणांवर निवडणूक आयोगाने दबाव आणणे योग्य नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीन ते साडेतीन वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रांवर थांबून राहावे. खेळ अजून संपलेला नाही. भाजप मनोवैज्ञानिक खेळ खेळत आहे. हा भाजपचा माईंड गेम आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटले.

तर सुप्रिया श्रीनेत यांनीही काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. निवडणूक आयोगाने मतमोजणीची आकडेवारी बराचवेळ अपडेट केलेली नाही. आमच्याकडे ग्राऊंडवरुन येणाऱ्या माहितीनुसार काँग्रेसच्या बाजूने निकाल आहेत. अंतिम आकडेवारी येईल, तेव्हा काँग्रेसचे सरकार स्थापन झालेले असेल, असे सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले. 

हरियाणातील सध्याची परिस्थिती काय?

दुपारी साडेबारापर्यंत समोर आलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार हरियाणात भाजप 48 जागांवर, काँग्रेस 36 जागा, लोक दल 4 आणि अपक्ष उमेदवार हे 4 जागांवर आघाडीवर आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास भाजपला बहुमतासाठी लागणारी 46ची मॅजिक फिगर गाठण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे आता पुढील काही तासांत मतमोजणीचा ट्रेंड बदलणार का, हे पाहावे लागेल.

आणखी वाचा

हरियाणात 50 जागांवर भाजपची आघाडी, 4 महिने, 16 हजार सभा; RSSने संपूर्ण राजकीय खेळी बदलली?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 6 PM : 8 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHaryana Vidhan Sabha : हरियात विजय, दिल्लीत जल्लोष; थोड्याच वेळात मोदी संबोधित करणारABP Majha Headlines : 07 PM : 08 October 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGopichand Padalkar On Dhangar Andolan : मंत्रालयातल्या जाळीवर उड्या मारत धनगर कार्यकर्त्यांचं आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Suraj Chavan: बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
बिग बॉसमध्ये गुलीगत विजय मिळवलेला सुरज चव्हाण सोन्याच्या जेजुरीत; खंडेरायाचं दर्शन घेतलं अन् उधळला भंडारा
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?
Embed widget