एक्स्प्लोर

Aditya Thackeray: आदित्य ठाकरे बुधवारी बिहार दौऱ्यावर, तेजस्वी यादव यांची घेणार भेट

Aditya Thackeray: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बुधवारी एक दिवसाच्या बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत.

Aditya Thackeray: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बुधवारी एक दिवसाच्या बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदी उपस्थित राहतील. आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांची भेट दुपारी 3 वाजता होणार आहे. पक्षाने याबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे. 

महाराष्ट्र महाविकास आघाडीचा प्रयोग करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केली होती. मात्र शिवसेनेत फूट पडून ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आणि मविआ सरकार कोसळे. याच्याच काही दिवसानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून आरजेडी सोबत हातमिळवणी केली आणि नवीन सरकार स्थापन झालं. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे यांची ही भेट मुंबईच्या येत्या महानगरपालिका निवडणुकीवर परिणामकारक ठरू शकते, अशी चर्चा आहे. याच कारण म्हणजे मुंबईत मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय नागरिक राहतात. मुंबईच्या पालिकेच्या अनेक जागांवर त्यांचं मत हे परिणामकारक ठरू शकतं.            

यातच बुधवारी आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यात ते कोण-कोणत्या ठिकाणी भेट देणार आहेत. तसेच त्यांच्या या दौऱ्यामागे नेमकं काय कारण आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही. यातच तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे, हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तत्पूर्वी शिवसेनेत फूट पडल्यावर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा केला होता. यावेळी त्यांनी शिवसेना आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार, असे संकेत दिले होते. या अनुषंगाने देखील ही भेट महत्वाची मानली जात आहे.  दरम्यान, राष्ट्रीय राजकारणात आदित्य ठाकरे सक्रिय होताना दिसत आहेत. अलीकडेच उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या दोन्ही राज्यात भाजपने एकहाती विजय मिळवला आहे. या दोन्ही राज्याच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे हे स्वतः प्रचारात उतरले होते. उत्तर प्रदेशमध्ये देखील त्यांनी स्वतः सभा घेतली होती.  

इतर महत्वाची बातमी: 

Sangli News : वन विभागाच्या विमा नसलेल्या गाडीने झालेल्या अपघातात संसार उघड्यावर, 'त्या' कुटुंबाला विशेष बाब म्हणून मदत करणार; सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
Embed widget