CM Eknath Shinde on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या दाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
CM Eknath Shinde on Aaditya Thackeray : बंड करण्यापूर्वी एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपसोबत गेलो नाही तर आपल्याला अटक होईल, असं शिंदेंनी सांगितल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
CM Eknath Shinde on Aaditya Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडाबाबत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. बंड करण्यापूर्वी एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपसोबत गेलो नाही तर आपल्याला अटक होईल, असं शिंदेंनी सांगितल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. "आदित्य ठाकरे लहान आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका," असं एकनाथ शिंदे यांनी म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापायला लागलं. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. परंतु आदित्य ठाकरे लहान आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावरची चर्चा थांबवली.
आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?
आदित्य ठाकरे यांनी एक दिवसाचा हैदराबाद दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी गीतम विद्यापीठाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिवसेनेतील फूट आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत मोठा खुलासा केला. ते म्हणाले की, "शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी एकनाथ शिंदे मातोश्रीवर आले होते. ते रडायला लागले आणि म्हणाले की भाजपसोबत हातमिळवणी करा अन्यथा ते आम्हाा जेलमध्ये टाकतील. मी भाजपसोबत नाही गेलो तर तुरुंगात जाईन, असं ते सांगत होते."
CM Eknath Shinde on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे बालिश आहेत : एकनाथ शिंदे
शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं, राऊतांची शिंदेंवर टीका
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) आदित्य ठाकरे यांचा हा दावा खरा असल्याचं म्हटलं आहे. "माझ्या घरात येऊन एकनाथ शिंदे हेच बोलले होते की भाजपासोबत जायला पाहिजे नाहीतर मला जेलवारी करावी लागेल. आपण गटबंधन आपण हे तोडलं पाहिजे. यावेळी मी त्यांना एकाच सवाल केला की, आपल्याला हे असं का करायचं आहे. जर पार्टीने आपल्याला संधी दिली आहे तर ती आपण निभावून दाखवू," असे राऊत म्हणाले. शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं असे म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाढीत शौर्य होते, ते शौर्य तुम्ही दाखवायला हवे. पण तुम्ही घाबरलात, इतरांनाही घाबरवले असे राऊत म्हणाले. त्यावेळी जे आमदार आणि खासदार निघून गेले त्यांच्यातील निम्म्या लोकांवर ईडीच्या कारवाया सुरु होत्या. ते लोक घाबरुनच तिकडे गेल्याचे राऊत म्हणाले.
हेही वाचा
Sanjay Raut : शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा