Sanjay Raut : शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली.
Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) हे अटकेला घाबरले होते. मातोश्रीवर येऊन ते रडले होते असा दावा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) आदित्य ठाकरे यांचा हा दावा खरा असल्याचं म्हटलंय. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं असल्याची टीकाही राऊतांनी केली आहे.
तुम्ही घाबरलात, इतरांनांही घाबरवलं
माझ्या घरात येऊन एकनाथ शिंदे हेच बोलले होते की भाजपासोबत जायला पाहिजे नाहीतर मला जेलवारी करावी लागेल. आपण गटबंधन आपण हे तोडलं पाहिजे. यावेळी मी त्यांना एकाच सवाल केला की, आपल्याला हे असं का करायचं आहे. जर पार्टीने आपल्याला संधी दिली आहे तर ती आपण निभावून दाखवू असे राऊत म्हणाले. आपण या दबाव तंत्राला घाबरुन न जाता एकत्र लढा दिला पाहिजे असे एकनाथ शिंदेंना सांगितले होते असे राऊत म्हणाले. त्यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं असे म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाठीत शौऱ्य होते, ते शौर्य तुम्ही दाखवायला हवे. पण तुम्ही घाबरलात, इतरांनांही घाबरवले असे राऊत म्हणाले. त्यावेळी जे आमदार आणि खासदार निघून गेले त्यांच्यातील निम्म्या लोकांवर ईडीच्या कारवाया सुरु होत्या. ते लोक घाबरुनच तिकडे गेल्याचे राऊत म्हणाले.
अटक केली तरी मी घाबरलो नाही
दबाव तंत्र हे लपवलं गेले नाही. आजही ते सुरु आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांवर त्याच प्रकारचा दबाव तंत्र सुरू असल्याचे संजय राऊत म्हणाले. मला जेव्हा ईडीने अटक केली, तेव्हा तुम्हा सगळ्यांना भगवा उपरणे दाखवत मी ईडीच्या गाडीत बसलो होतो असे राऊत म्हणाले. मी अजिबात घाबरलो नव्हतो, कारण माझ्यावरती केलेले आरोप हे चुकीचे होते आणि खोटे होते असे संजय राऊत म्हणाले. काहीच न करता माझ्यावर अशा प्रकारचे आरोप लागल्यानं मला जेलवारी करावी लागल्याचे राऊतांनी सांगितले. त्यावेळी मी सर्वांना सांगत होतो की निडरपणे सगळ्यांनी सामोरे गेले पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, शिवसैनिक आहोत हे दाखवून दिले पाहिजे असे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: