उद्योगमंत्री फक्त पत्रकार परिषद घेण्यासाठी दावोसला गेले, आदित्य ठाकरेंचा सामंतांना टोला, म्हणाले, सगळं काम मुख्यमंत्र्यांनी केलं
Aaditya Thackeray on Uday Samant उद्योग मंत्री (उदय सामंत) फक्त पत्रकार परिषद घेण्यासाठी दावोसला गेले होते. बाकी सगळे काम मुख्यमंत्र्यांनी केल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
Aaditya Thackeray on Uday Samant : चार लाख कोटींची करार केले मात्र त्यातील 70 टक्के करार हे आधीच झालेले होते. आमच्या सरकारने आम्ही गुंतवणूक आणली फसवणूक केली नाही असे म्हणत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली. उद्योग मंत्री (उदय सामंत) फक्त पत्रकार परिषद घेण्यासाठी दावोसला गेले होते. बाकी सगळे काम मुख्यमंत्र्यांनी केल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. पुढच्या वेळेस उद्योगमंत्री म्हणून ज्या कोणाला घेऊन जाणार त्यांना फॅशन परेड करायला सांगू नका, त्यांना 4 दिवस तिथे बसायला सांगा तिथे काम करायला सांगा असा टोला आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांनी लगावला.
4 दिवस जर उद्योगमंत्री तिथे थांबू शकत नाहीत, तर कामं कशी होणार?
प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांच्या आधी उद्योग मंत्री पोहोचायला हवेत. पण ते मुख्यमंत्र्यांच्या नंतर गेले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होते म्हणून उशीरा निघाले का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. उद्योगमंत्री यांचा असा काय कार्यक्रम होता जे तिथे थांबू शकत नव्हते? पक्षांतर्गत नाराजी होती का? मुख्यमंत्री सगळे काम सोडून तिथे थांबता होते, मात्र उद्योगमंत्री का थांबू शकत नाहीत? असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी केला. उद्योगमंत्री सामंत मुख्यमंत्र्यांसोबत दावोसला का गेले नाहीत? असा सवाल देखील ठाकरे यांनी केला. एकच दिवस ते तिथे थांबले आणि परत भारतात आले. मग ते भारतात लगेच का आले? एकनाथ शिंदे नाराज होते म्हणून आले का? त्यांची समज काढण्यासाठी त्यांना पाठवलं का? असे सवाल ठाकरेंनी केला. 4 दिवस जर उद्योगमंत्री तिथे थांबू शकत नाहीत, तर कामं कशी होणार असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
संपूर्ण चार दिवस करार करण्यामध्ये घालण्यात अर्थ नव्हता
मी मुख्यमंत्र्यांना सल्ला देऊ इच्छितो. सल्ला देण्याइतपत मी एवढा मोठा नाही. पण इतर राज्यातील मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात जाऊन मॅग्नेटिक महाराष्ट्र सारखा कार्यक्रम घेतात तो घ्यावा असेही आदित्य ठाकरे म्हणाले. मागील दोन वर्षापासून मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम झालेला नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. संपूर्ण चार दिवस करार करण्यामध्ये घालण्यात अर्थ नव्हता. जगभरातले नेते, विविध देशातील उद्योगपती यांच्या भेटीसाठी घेण्यास सुद्धा गरजेच्या आहेत. तो प्रयत्न मी केला होता. मात्र, यावेली तसा कुठलाही प्रयत्न झाला नाही कोणत्याही भेटीसाठी घेतल्या नाहीत अस ठाकरे म्हणाले. काही गुंतवणूक चांगल्या झाल्या त्याचा आनंद आहे. पण काही ठिकाणी गुंतवणूक झाल्यासारखं दाखवून फसवलं जात आहे असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: