Abhijeet Patil and Shikhar Bank : इकडं अजितदादांना क्लीनचीट, तिकडं शरद पवारांच्या सभेत असतानाच अभिजीत पाटलांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई
Abhijeet Patil and Shikhar Bank, Pandharpur : माढा लोकसभेसाठीचे (Madha Loksabha) महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्या प्रचारार्थ करमाळा तालुक्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
Abhijeet Patil and Shikhar Bank, Pandharpur : माढा लोकसभेसाठीचे (Madha Loksabha) महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्या प्रचारार्थ करमाळा तालुक्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटीलही (Abhijeet Patil) उपस्थित होते. मात्र, करमाळ्यातील (Karmala) सभेत असतानाच अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीनचीट मिळाली असताना अभिजीत पाटलांवर कारवाई झाल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
शिखर बँकेकडून अभिजीत पाटलांचा कारखाना सील
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील साखर पोती साठा बँकेने जप्त केला. शिवाय जप्तीची कारवाई केल्यानंतर शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना सील केला आहे. शिखर बँकेचे पैसे न भरल्याने काही दिवसापूर्वी बँकेने कारवाई सुरू केली होती. यावर पाटील यांनी स्टे घेतला होता. आज स्टे उठताच बँकेच्या अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई केली. ही कारवाई सुरू असताना अभिजित पाटील हे करमाळा येथे शरद पवार यांच्या सभेत होते. रोहित पवार यांनी भाषणात कारवाई सुरू झाल्याचे सांगताच पाटील तातडीने पंढरपूरकडे रवाना झाले. अभिजित पाटील यांनी पंढरपूरमध्ये आज शरद पवार यांची संध्याकाळी सभा ठेवली आहे. शरद पवार आज (दि.26) मुक्कामाला पंढरपूरमध्ये असताना ही कारवाई झाल्याने खळबल उडाली आहे.
अभिजीत पाटील मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी मैदानात
धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभेतून मैदानात उतरल्यानंतर अभिजीत पाटील यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. मोहिते पाटील पक्षात आल्यामुळे मलाच आमदार झाल्यासारखं वाटू लागलयं, असंही अभिजीत पाटील यांनी म्हटलं होतं. दरम्यान अजित पवार आणि सुनेत्रा पवारांना क्लीनचीट मिळाली असतानाच दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांवर कारवाई सुरु असल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
अभिजीत पाटलांना रोहित पवारांनी दिली माहिती
अभिजीत पाटील आज (दि.26) आज करमाळ्यातील मोहिते पाटलांच्या सभेसाठी उपस्थित होते. त्यांना कारखान्यावर कारवाई सुरु असल्याची कोणतीही माहिती नव्हती. मात्र, आमदार रोहित पवार यांनी स्टेजवरुन त्यांना कारखान्यावर कारवाई होत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे करमाळ्यात असतानाच अचानकपणे अभिजीत पाटलांना पंढरपूरला जावे लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या