एक्स्प्लोर

Omraje Nimbalkar and Aaditya Thackeray: तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले,आता सहन करणार नाही, खासदार फुटीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Omraje Nimbalkar and Aaditya Thackeray: ओमराजे निंबाळकर म्हणाले, तुम्ही फिरायला हवं होतं; आदित्य ठाकरेंचा पलटवार म्हणाले, 'तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलंय हेच सत्य.....'

Omraje Nimbalkar and Aaditya Thackeray: उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणांमुळे सातत्याने फिरणे शक्य नसले तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवे होते, असे वक्तव्य करणारे ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यासहित अन्य फुटीर खासदारांना आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात, मेहनत घेतात. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आरोग्याच्या कारणांमुळे सातत्याने फिरणे शक्य नसले तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवे होते, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विट करुन जोरदार पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये थेट ओमराजे निंबाळकर यांचे नाव घेतले नसले तरी शिंदे गटात जाण्यासाठी वेगवेगळी कारणे देणाऱ्या खासदारांना त्यांनी लक्ष्य केले आहे. (Maharashtra Politics news)

आज आपला 60 वा वर्धापन दिन! पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती 2024 मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत! कितीही कारणे द्या... सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे. स्वतःला तर विकलेच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचे नाव आणि तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावले आहे. महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही! ह्या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल!, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Operation Tiger: उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं, म्हणाले...

मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे. भावनिकदृष्ट्या पक्ष सोडण्याचा विचार केला तर निर्णय चुकीचा वाटतो. मात्र, राजकीयदृष्ट्या विचार केला तर बरोबर आहे. आम्ही खासदार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत स्वतःची माणसं निवडून येत नसतील, तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे त्यांनी म्हटले. तर मतदारसंघात रस्ते, पूल, डीपी यांसारखी कामे करण्यासाठी वारंवार प्रस्ताव देऊनही कामे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सत्ता आणि निधी नसल्याने लोकांची कामे करता येत नाहीत, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.

आणखी वाचा

Uddhav Thackeray-Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरे ओमराजे निंबाळकरांचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत, धाराशिवमधील बड्या नेत्यांना मातोश्रीवर बोलावलं

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Advertisement

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget