एक्स्प्लोर

मोठी बातमी! काँग्रेसच्या तिसऱ्या आमदाराचा राजीनामा; अधिवेशनापूर्वीच विधानसभेतील संख्याबळ घटलं

मुंबईतील धारावी मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार व माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज आपल्या आमदारपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपने उमेदवारी दिलेल्या आमदारांनाही पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवलेल्या आमदारांना खासदार बनण्याची संधी मिळाली. त्यामुळे, खासदार बनल्यानंतर आता या आमदारांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी सोलापूरच्या काँग्रेस आमदार (MLA) प्रणिती शिंदे आणि दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांनी आपल्या आमदरकीचा राजीनामा (Resignation) दिला होता. आता, धारावी मतदारसंघातील आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, खासदार बनलेल्या राज्यातील 3 आमदारांनी राजीनामा दिला असून आणखी 4 आमदार राजीनामा देणार आहेत. त्यामुळे, विधिमंडळ अधिवेशनापूर्वीच काँग्रेसचं विधानसभेतील संख्याबळ घटलं आहे.

मुंबईतील धारावी मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार व माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज आपल्या आमदारपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड ह्या 29 उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून विजयी होऊन खासदार बनल्या आहेत, म्हणून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये सोलापूर दक्षिणच्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर खासदार झाल्या आहेत. तर, बळवंत वानखेडे हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते, त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून 19731 मतांनी नवनीत राणा यांचा पराभव केला आहे. त्यामुळे, हे तिन्ही आमदार आता खासदार बनून दिल्लीत जात आहेत. दरम्यान, निलेश लंके यांनी अगोदरच आपला राजीनामा दिला होता. 

हे तीन आमदार देणार राजीनामा

विदर्भातील वर्धा विधानसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर आमदार होत्या. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पराभव केला. तर, मराठवाड्यातील संदीपान भुमरे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत ते खासदार झाले आहेत. मुंबईत शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली. रवींद्र वायकर यांनी 48 मतांनी अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला. काँग्रेस नेत्या आणि आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात उज्ज्वल निकम यांना पराभूत केलं आहे. 

प्रतिभा धानोरकर - वर्धा
संदीपान भुमरे- संभाजीनगर
रवींद्र वायकर - जोगेश्वरी पूर्व

हेही वाचा

पराभवानंतरही बक्षीस, उज्ज्वल निकमांची पुन्हा विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती; काँग्रेसनं घेतला आक्षेप 

नाना पटोलेंचे पाय धुणारा कार्यकर्ता नॉट रिचेबल; कुटुंबीयांनी दिली वेगळीच माहिती, जिल्ह्यात चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget