![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pitru Paksha : पितृपक्ष संपण्याआधी घरी आणा 'ही' वस्तू; लाभेल पितरांचा आशीर्वाद, संकटं दूर होऊन सुख-समृद्धी नांदेल
Pitru Paksha 2024 : पुण्य प्राप्तीसाठी पितृ पक्षाला अधिक महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार, या काळात काही वस्तू घरात आणल्याने घराची बरकत होते, घरात लक्ष्मी नांदते. पितृ दोष, वास्तू दोष दूर होतो आणि धनलाभ होतो.
![Pitru Paksha : पितृपक्ष संपण्याआधी घरी आणा 'ही' वस्तू; लाभेल पितरांचा आशीर्वाद, संकटं दूर होऊन सुख-समृद्धी नांदेल Pitru Paksha 2024 Remedies vastu tips for dhan labh upay bring these 5 things home to get strong wealth financial status will rise Pitru Paksha : पितृपक्ष संपण्याआधी घरी आणा 'ही' वस्तू; लाभेल पितरांचा आशीर्वाद, संकटं दूर होऊन सुख-समृद्धी नांदेल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/25/376e985bf2b1fb623c2217da1d63166d1727236674376713_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vastu Tips For Money : हिंदू धर्मात पितृ पक्षाला (Pitru Paksha 2024) विशेष महत्त्व आहे. या काळात काही विशेष गोष्टी केल्याने पितृ दोष दूर होतो आणि घरात सुख-शांति नांदते. वास्तुशास्त्रानुसार, पितृ पक्षात काही गोष्टी घरात आणणं हे खूप शुभ मानलं जातं. या गोष्टी घरात ठेवल्यास वास्तुदोष (Vastu Tips) होत नाही. घरात पितृ दोष किंवा वास्तुदोष असल्यास तो दूर होतो.
वास्तुदोषामुळे व्यक्तीला आर्थिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या सर्वातून मुक्ती मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. धनलाभ आणि आर्थिक भरभराटीसाठी तुम्ही हे उपाय करू शकतात. वास्तुशास्त्रानुसार, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी काही वस्तू घरात ठेवल्या पाहिजे. या वस्तू नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
सुख-शांतिसाठी घरी आणा 'या' वस्तू
श्रीफळ - घरात श्रीफळ, म्हणजेच नारळ ठेवणं फार शुभ मानलं जातं. ज्या घरात श्रीफळ ठेवलं जातं, त्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो आणि त्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात. श्रीफळ हे शुभ असल्याने प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला देखील नारळ फोडला जातो.
कासव - कासव हा भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो. असं मानलं जातं की, कासव घरात ठेवल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. वास्तुशास्त्रानुसार कासवाला नेहमी उत्तर दिशेला ठेवावं, तरच याचे चांगले फायदे मिळतात.
पिरॅमिड - वास्तुशास्त्रानुसार, पिरॅमिड घरात ठेवल्याने घरात समृद्धी नांदते, आर्थिक स्थिती सुधारते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. ज्या घरात क्रिस्टल पिरॅमिड असतो, त्या घराचं उत्पन्न वाढतं, असं म्हटलं जातं. क्रिस्टल पिरॅमिड घरात ठेवल्याने करिअरला उभारी मिळते. नोकरी-व्यवसायात प्रगती होते.
गोमती चक्र - गोमती चक्र घरात ठेवल्याने घरात सुख, शांति आणि समृद्धी नांदते. असं म्हणतात की, 11 गोमती चक्रं पिवळ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवल्याने देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होतो. गोमती चक्र घरात ठेवल्याने घराची बरकत होते.
कमळगट्टा हार - आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी कमळगट्ट्याची माळ शुभ मानली जाते. कमळगट्ट्याची माळ लक्ष्मी देवीला प्रिय आहे. कमळगट्टा माळ घरात ठेवल्याने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो, घरात सकारात्मक ऊर्जा राहते. कमळगट्टे कमळाच्या झाडापासून बनतात आणि हे काळ्या रंगाचे असतात. हे बाजारात सहजरीत्या मिळतात. मंत्र जपासाठी कमळगट्ट्याची माळ लाभदायक मानली जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)