एक्स्प्लोर

Parlikar On Dhananjay Munde: धनंजय मुंडे समर्थनार्थ परळीकर मैदानात, अंजली दमानियांवर हल्लाबोल, म्हणाले, ना वाल्मिक अण्णा दोषी, ना धनूभाऊ!

Parlikar On Dhananjay Munde: संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी बीड जिल्हा गेल्या काही दिवासांपासून चर्चेत आहे.

Parlikar On Dhananjay Munde बीड: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येला 50 दिवस झाले आहेत. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर वारंवार आरोप होत असलेले तसेच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik karad) याच्यावर खंडणीचा गुन्हा तसेच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी बीड जिल्हा गेल्या काही दिवासांपासून चर्चेत आहे. तसेच वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच काही पुरावे देखील अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना दिले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नेमका कोणता निर्णय घेणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान आता धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ परळीकर मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ परळीकर एबीपी माझाशी बोलताना काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनामा बाबत स्पष्ट केले आहे ते दोष असतील तर त्यांचा राजीनामा घेतला जाईल. 

धनंजय मुंडे यांना मीडिया ट्रायल करून बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. दोन महिने नकारात्मक बातम्या लावून एखाद्याचं आयुष्य उध्वस्त करण्याच सुरू आहे. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी परळीची जनता सक्षम आहे. 

धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचं थांबवलं गेलं पाहिजे असं परळीकर म्हणून आमची भावना आहे.

वाल्मिक कराड हे गुन्हेगार नाहीत. प्रत्येकाच्या मदतीसाठी ते पुढे येतात, त्यांच्या मदतीमुळे त्यांचं नाव मोठे झाल आहे. त्यांच्या नावाला रोखण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे.

वाल्मिक कराड यांच्या नावावर खोट्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे. सुरेश धस यांनी त्यांचे प्रस्थ वाढत असल्याने खोटे गुन्ह्याची नोंद केली आहे. हे गुन्हे मागे घेतले जावेत.

घटनेचा तपास क्रम योग्य दिशेने सुरू आहे. या सर्व गोष्टी विरोधकांच्या म्हणण्यानुसार आणि कायद्याच्या तरतुदीनुसार सगळं व्यवस्थित आजपर्यंत सुरू आहे. अंजली दमानिया यांच्याकडून मागितले जाणाऱ्या राजीनामा बाबत काही तथ्य नाही. बिन बुडाचे आरोप जमाने यांच्याकडून केले जात आहेत. राजकीय नेत्याचा खचकरण करण्याचे षडयंत्र दमानिया करत आहेत. चांगल्या मंत्र्याला काम करू द्यावं त्यांनी यापुढे राजीनामाची मागणी करू नये...

अंजली दमानिया महाराष्ट्रातील बहुजन नेत्यावरच का बोलतात हाच आम्हाला प्रश्न पडला आहे. महाराष्ट्रात अनेक गंभीर विषय आहेत त्या विषयावर का भांडत नाही. शेतकरी विद्यार्थी यांच्या विषयी त्या बोलत नाहीत. यापूर्वी देखील छगन भुजबळ यांच्यावर त्या बोलल्या आणि घरी बसवण्याचे काम त्यांनी केलं. आणखी बरेच नेते आहेत त्यांच्याबद्दल त्या बोलत नाहीत, अशी प्रतिक्रिया परळीकरांनी दिली आहे.

संबंधित बातमी:

Dhananjay Munde Ajit Pawar Meeting: मी फडणवीसांना सगळी कागदपत्रे दिली, अजितदादांनी सगळ्या आमदारांसमोर सांगितलं; धनंजय मुंडे म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 29 January 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सDhananjay Deshmukh On Hotel CCTV :आरोपींसोबत API, हॉटेलमधील CCTV, 50 दिवसांनी धनंजय देशमुख म्हणाले..Mahakumbh Mela Stampede : पत्नी आणि नातेवाईक हरवले..,मी पडलो, माझ्या अंगावरुन लोक गेलेCM Yogi Adityanath On stampede : महाकुंभमधील चेंगराचेंगरीवर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Share Market : भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन,अर्थसंकल्पाकडून आशा 
अर्थसंकल्पाकडून आशा,भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन 
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
Walmik Karad Wife Property: लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या आलिशान बंगल्याचं काम थांबवलं; नेमकं काय घडलं?
Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी विद्यार्थ्यांना दिला यशस्वी होण्याचा मंत्र, प्रगतीसाठी एआयचा नव्हे बुद्धीचा वापर करण्याचा सल्ला
मुकेश अंबानींचा विद्यार्थ्यांना सल्ला,प्रगतीसाठी एआयचा नव्हे तुमच्या बुद्धीचा वापर करा...
Embed widget