Parineeti-Raghav Wedding : परिणीती-राघव यांना अरविंद केजरीवालांनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले, "सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा"
Parineeti-Raghav Wedding : परिणीती-राघव लग्नबंधनात अडकले असून अरविंद केजरीवाल यांनीदेखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
![Parineeti-Raghav Wedding : परिणीती-राघव यांना अरविंद केजरीवालांनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले, Parineeti chopra Raghav Chadha wedding udaipur live updates Wedding photos Arvind Kejriwal Shared Post on social media and wish newly wed couple Parineeti-Raghav Wedding : परिणीती-राघव यांना अरविंद केजरीवालांनी दिल्या शुभेच्छा; म्हणाले,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/26/86d7a3613f0ef8907928195ace06b92a1695706843915254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Updates : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) लग्नबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राघव-परिणीतीचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहेत. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीदेखील दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राघव आणि परिणीतीच्या लग्नासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उदयपूरला गेले होते. आता त्यांनी सोशल मीडियावर राघव-परिणीतीचा एक फोटो शेअर करत दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांनी पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"राघव-परिणीती तुम्हा दोघांनाही सुखी संसारासाठी खूप-खूप शुभेच्छा".
आम आदमी पार्टीनेदेखील ट्वीट करत राघव-परिणीती यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना आप परिवाराकडून नव्या आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा".
Best wishes from the AAP family to our MP @raghav_chadha & @ParineetiChopra for the new beginnings ❤️
— AAP (@AamAadmiParty) September 25, 2023
Wishing you both a lifetime of love and happiness. 💑🎉#RaghavParineetiKiShaadi #RaghavChadha #ParineetiChopra pic.twitter.com/vYIJIDVTn7
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघेही मेड फॉर इच अदर दिसत आहेत. लग्नसोहळ्यात परिणीतीने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला लेहेंगा परिधान केला होता. तर राघव यांनीदेखील खास आऊटफिट परिधान केला होता.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शाही विवाहसोहळा उदयपूरमधील द लीला पॅलेसमध्ये पार पडला. या लग्नसोहळ्यात बॉलिवूडकरांसह अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. पण परिणीतीची बहीण प्रियंका मात्र या लग्नसोहळ्याला हजर नव्हती.
परिणीती-राघव यांच्या लग्नसोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात थिरकताना दिसत आहे. या व्हिडीओवर एक दुजे के लिए, नांदा सौख्य भरे, एक नंबर जोडी अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
संबंधित बातम्या
Parineeti Chopra Raghav Chadha : पहिली भेट ते लगीनगाठ; नववधू परिणीतीची लग्नानंतरची पहिली पोस्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)