Parbhani Teaher Sucide: परभणीत शिक्षकाने संपवलं जीवन, चिठ्ठी लिहली, संस्थाचालकानेच फसवलं
Parbhani Teacher Sucide: परभणी जिल्ह्यातील मंगरूळ येथे नरसिंह प्राथमिक विद्यालयातील शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Parbhani: राज्यात बोगस शिक्षक भरतीचे प्रकरण गाजत असतानाच परभणीत अशाच बोगस शिक्षक भरतीने एका शिक्षकाचा बळी घेतलाय.श्री नरसिंह प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या 35 वर्षीय शिक्षक सोपान पालवे यांनी आत्महत्या केलीय. एक हृदयद्रावक अशी चिट्ठी लिहून ठेवत त्यांनी आपबिती सांगितली आहे. संस्थाचालकाने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी या चिठ्ठीत केला आहे. संस्थेने केलेली शिक्षक भरती बोगस असल्याचा गंभीर आरोपही या चिठ्ठीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे परभणीत मोठी खळबळ उडाली आहे. (Parbhani)
या चिठ्ठीत संस्थेचे सचिव यांनी भरतीसाठी 20 लाख आणि त्यानंतर 20% वरून 60% टप्पा अनुदानावर नियुक्ती करण्यासाठी 5 लाख रुपये घेतले परंतु तरीही त्यांना काही महिन्याचे वेतन देण्यात नाही तर 60% साठी पैसे देऊनही काही महिन्याचा पगार 20%प्रमाणे काढला असल्याचा आरोप त्यांनी चिठ्ठीत केलाय. यामुळे अस्वस्थ झालेल्या व आर्थिक विवंचनेत सापडल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणात संस्थेचे सचिव बळवंत खळीकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parbhani Teacher Sucide)
नक्की घडले काय?
परभणी जिल्ह्यातील मंगरूळ येथे नरसिंह प्राथमिक विद्यालयातील शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नरसिंह प्राथमिक विद्यालय मंगरूळ येथील सोपान शिवराम पालवे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.त्यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवलं. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात संस्थेच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. संस्थाचालकाने आर्थिक पिळवणूक केल्याची चिठ्ठी आत्महत्या करण्यापूर्वी शिक्षकाने लिहून ठेवली आहे.
परभणीच्या सेलू तालुक्यातील आडगाव दराडे येथील 35 वर्षीय तरुण सोपान पालवे यांनी आज परभणी तालुक्यातील आरपी रुग्णालयाच्या शेजारी एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आणि एक चिट्ठी ही त्यांनी लिहून ठेवली. ज्यात ज्या शिक्षण संस्थेत ते काम करत आहेत तिथले सचिव बळवंत खळीकर यांनी सातत्याने त्यांचा कसा छळ केला. याबाबत त्यांनी लिहून ठेवले आहे.भरती करतांना शेत विकून त्यांनी 20 लाख रुपये या सचिवाला दिले .त्यानंतर टप्पा अनुदान वाढवण्यासाठी ही 5 लाखांची मागणी करण्यात आली. बरं एवढे पैसे देऊनही त्यांना वेळेवर पगार दिला जात नव्हता. कधी 20% नि पैसे मिळायचे कधी मिळायचेच नाही, त्यामुळे या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलीय. यानंतर परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात सचिव बळवंत खळीकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पालवे यांच्या कुटुंबियांकडून खळीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीय.दरम्यान आम्ही या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम चव्हाण तसेच सचिव बळवंत खळीकर यांच्याशी संपर्क केला मात्र त्यांचा संपर्क झाला नाही.
नागपूरमध्ये बोगस शिक्षक भरतीचा घोळ
राज्याची उपराजधानी नागपुरातील 580 शिक्षक भरती घोटाळ्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्त (Bogus Teacher Appointment) करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. सोबतच या बोगस नियुक्ती आणि वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावण्यात येत असल्याचे समोर आले आहे. हे खुद्द शिक्षण विभागाने हे त्यांच्या एका आदेशात मान्य केले आहे. दुसरीकडे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या घोटाळ्याची कसून चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे.
हेही वाचा:
























