एक्स्प्लोर

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! तापमानाचा पारा 44 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान? 

राज्यातील तापमानात (Temperature) वाढ होत आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा 35 ते 40 अंशाच्या घरात गेला आहे. तर काही ठिकाणी 42 ते 43 अंशावर तापमानाचा पारा गेला आहे.

Maharashtra Weather : राज्यातील तापमानात (Temperature) वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा 35 ते 40 अंशाच्या घरात गेला आहे. तर काही ठिकाणी 42 ते 43 अंशावर तापमानाचा पारा गेला आहे. त्यामुळं नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार (IMD), अकोल्यात (Akola) आज राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. अकोल्यात आज तापमानाचा पारा 44.2 अंशांवर पोहोचलाय. तर चंद्रपूरमध्ये (Chandrapur ) 43.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद?

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अकोल्यात आज या मोसमतलं सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं आहे. अकोल्याचा पारा आज 44.2 अंशांवर गेला आहे. काल अकोल्याचं तापमान 43.2 अंश सेल्सिअस होतं. दरम्यान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यात देखील तापमानात मोठी वाढ झाली आहे. आज चंद्रपुरात तापमानाचा 43.6 अंशावर गेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यात देखील तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. हिंगोलीत तापमानाचा पारा 41 अंशावर पोहोचला आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात मागच्या 2 दिवसांपासून तापमान चांगलेच वाढले आहे. काल 40 तर आज थेट 41.03 अंशांवर तापमान गेले आहे. सलग दोन दिवस तापमान चाळीशी पार गेल्याने सर्वत्र प्रचंड उकाडा जाणवत आहे.ज्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबरच बाजारपेठेत ही दुपारच्या सुमारास शुकशुकाट पाहायला मिळत आहे.घरबाहेर पडलेले परभणीकर डोक्याला रुमाल,टोपी घालून बाहेर पडत आहेत.

दरम्यान, सध्या अकोल्यात सूर्य अक्षरशः आग ओकतोय. आज अकोल्यात या मोसमतला सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आलं आहे.  काल अकोला हे महाराष्ट्रातला सर्वाधिक उष्ण शहर होतं. कालचा अकोल्याचा पारा 43.2 अंशावर होता. या वाढत्या तापमानाचा परिणाम अकोल्याच्या जनजीवनावर झालाय. दुपारच्या वेळी अकोल्यातील रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत.  

गेल्या पाच दिवसातील अकोल्यातील तापमान 

तारीख                   तापमान 

03 एप्रिल         37.1
04 एप्रिल         39.0
05 एप्रिल         41.7
06 एप्रिल         43.2
07 एप्रिल          44.2

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काय काळजी घ्यावी?

दरम्यान, अकोला जिल्हा प्रशासनाने वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.  

उन्हात अतिशय महत्त्वाचे काम असले तरच घराबाहेर पडा. 
घराबाहेर पडताना डोक्याला सुती दुपट्टा किंवा उपरणं बांधा.
यासोबतच उन्हापासून डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी सन गॉगल्स घाला.
बाहेर निघताना सोबत थंड पाण्याची बाटली ठेवा.
भरपूर पाणी प्या. यासोबतच ताक, नींबूपाणी आणि शीतपेय यांचा अधिकाधिक वापर करा.

महत्वाच्या बातम्या:

सावधान! विदर्भात उष्णतेची लाट, 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मध्य महाराष्ट्रात विखुरलेले ढग, किती होते आज तुमच्या शहरात तापमान? वाचा सविस्तर

महत्त्वाच्या बातम्या

Operation Tiger: त्या दिवशी 'ऑपरेशन टायगर' पूर्ण होणार; केंद्रीय मंत्री प्रताप जाधवांचा मोठा दावा, ठाकरेंचे खासदार साथ सोडणार?
त्या दिवशी 'ऑपरेशन टायगर' पूर्ण होणार; केंद्रीय मंत्री प्रताप जाधवांचा मोठा दावा, ठाकरेंचे खासदार साथ सोडणार?
धक्कादायक! परभणीच्या जिंतूर तालुक्यात भीषण अपघात, आजी, आजोबांसह नातवाचा जागीच मृत्यू
धक्कादायक! परभणीच्या जिंतूर तालुक्यात भीषण अपघात, आजी, आजोबांसह नातवाचा जागीच मृत्यू
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
Vidhan Parishad Election 2026: महायुती अन् मविआला बंडखोरांमुळे डोकेदुखी; परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक रंगतदार होणार; प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीत पहिला उमेदवारी अर्ज मागे
महायुती अन् मविआला बंडखोरांमुळे डोकेदुखी; परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक रंगतदार होणार; प्रतिस्पर्ध्यांच्या लढतीत पहिला उमेदवारी अर्ज मागे

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Danni Wyatt-Hodge: कधी काळी केलं होतं विराट कोहलीला प्रपोज अन् आता महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये शतकी तडाखा! इंग्लंडने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या सुद्धा रचली
कधी काळी केलं होतं विराट कोहलीला प्रपोज अन् आता महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये शतकी तडाखा! इंग्लंडने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या सुद्धा रचली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2026 | शनिवार
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाने नाणेफेक जिंकली, अफगाणिस्तान पहिल्यांदा बॅटिंग करणार; 'या' दोन खेळाडूंनी पदार्पण केलं
टीम इंडियाने नाणेफेक जिंकली, अफगाणिस्तान पहिल्यांदा बॅटिंग करणार; 'या' दोन खेळाडूंनी पदार्पण केलं
बांगलादेशी क्रिकेटरला पोलिसांनी रस्त्यावर चोपलं, मानेला हात घालत गाडीत कोंबला; विमानतळावरून घरी येताना हायहोल्टेज ड्रामा
बांगलादेशी क्रिकेटरला पोलिसांनी रस्त्यावर चोपलं, मानेला हात घालत गाडीत कोंबला; विमानतळावरून घरी येताना हायहोल्टेज ड्रामा
पुण्यात शिकलेले धीरज सेठ नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाकडून आदेश जारी, देशसेवेत मोठी जबाबदारी
पुण्यात शिकलेले धीरज सेठ नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाकडून आदेश जारी, देशसेवेत मोठी जबाबदारी
Air Force Plane Crash : भारतीय हवाई दलाचं विमान आसाममध्ये कोसळलं, जोरहाटमध्ये 5 जवानांना वीरमरण, को-पायलट बचावला, उपचार सुरु
भारतीय हवाई दलाचं विमान आसाममध्ये कोसळलं, 5 जवानांना वीरमरण, को-पायलट बचावला, उपचार सुरु
Jamun: जांभूळ पिकल्या झाडाखाली... गावागावात जांभळाची गोडी, यंदा फळ जास्ती का आलं? तज्ज्ञांनी कारण सांगितलं
Jamun: जांभूळ पिकल्या झाडाखाली... गावागावात जांभळाची गोडी, यंदा फळ जास्ती का आलं? तज्ज्ञांनी कारण सांगितलं
FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकपमध्ये तब्बल 96 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती! नेमकं घडलं तरी काय?
फिफा वर्ल्डकपमध्ये तब्बल 96 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती! नेमकं घडलं तरी काय?
Embed widget