एक्स्प्लोर

Parbhani: परभणीत रब्बी हंगामातील ‘ई पीक’ नोंदणीसाठी तीन दिवस विशेष मोहीम

Parbhani News: मोबाईल ॲपच्या (Mobile App) माध्यमातून या विशेष मोहिमेत जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन 100 टक्के ई-पीक नोंदणी करण्याचे आवाहन

Parbhani News: रब्बी हंगाम 2022-23 ची ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) 100 टक्के पूर्ण करण्यासाठी परभणी जिल्ह्यात (Parbhani District) जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी गुरुवारपासून तीन दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोबाईल ॲपच्या (Mobile App) माध्यमातून या विशेष मोहिमेत जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन 100 टक्के ई-पीक नोंदणी करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. अरुण जऱ्हाड, तहसीलदार गणेश चव्हाण पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 

शेतकऱ्यांनी हे पीक पाहणी ॲप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून ‘ई पीक पाहणी व्हर्जन-2’ हे ॲप ॲड्रॉईड मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे. या तीन दिवस चालणाऱ्या विशेष मोहिमेमध्ये पीक पेराच्या नोंदणी घेताना काही तांत्रिक अडचणी आल्यास जिल्हा प्रशासनाकडून संबंधित तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली मदत कक्षाची निर्मिती करण्यात आली असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. 

केवळ 18.32 टक्के शेतकऱ्यांकडून नोंदणी 

यंदाच्या 2022-23 या खरीप हंगामात साडेपाच लाख शेतकरी खातेदारांपैकी 3 लाख 64 हजार 646 शेतकऱ्यांनी ई -पीक पाहणीची नोंद केली. तर रब्बी हंगामातील साडेपाच लाख शेतकऱ्यांपैकी आजघडीला केवळ 18.32 टक्के क्षेत्रावरील शेतकऱ्यांनी नोंद केली असून, पुढील तीन दिवसात जास्तीत–जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी केले आहे.  जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतपिकांची नोंदणी करता येणार आहे. तसेच पिकाच्या भौगोलिक स्थानाचीही नोंद होणार असून, इंटरनेट उपलब्ध नसल्यास शेतकऱ्यांनी पिकांचे काढलेले छायाचित्र ते इंटरनेटच्या संपर्कात आल्यावर माहितीसह अपलोड करता येणार आहे. हे तंत्रज्ञान खूप सोपे आणि वापरण्यास अत्यंत सुलभ असल्याचे जिल्हाधिकारी काळे म्हणाले. 

नुकसान भरपाईची अचूक नोंद  होणार...

शेतकऱ्यांना पिकांची ई पीक नोंदणी करता येणार असल्यामुळे लागवडीच्या क्षेत्राची अचूक नोंद होणार आहे. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्याने केलेल्या नोंदीच्या माहितीचे 48 तासात संपादनही करता येणार आहे. शिवाय ही नोंदणी करताना तांत्रिक अडचणी उद्भवल्यास त्यासाठी तालुकास्तरावर आणि जिल्हास्तरावर मदतीसाठी संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. तर क्षेत्रीय स्तरावर पीक पाहणीची अचूक माहिती संकलित होण्याच्या दृष्टीने पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रकियेत शेतक-यांचा सक्रिय सहभाग वाढवणे, कृषि पतपुरवठा धोरण सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, याशिवाय नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अचूक नोंद आणि मदत करणे शक्य होणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

हिंदू-मुस्लिम एकोप्याचा परभणी पॅटर्न! शिवपुराण कथेसाठी मुस्लिम बांधवाने दिली 60 एकर जागा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Khatron Ke Khiladi 14: करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6 AM : 30  सप्टेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Khatron Ke Khiladi 14: करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Embed widget