एक्स्प्लोर

Bail Pola 2022: परभणीत बैल पोळ्याचा मिरवणूकीत राडा, थेट एकमेकांच्या डोक्यात...

Parbhani : पोलिसांनी याप्रकरणी 30 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

Parbhani : राज्यात शुक्रवारी सर्वत्र बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतांना, परभणी जिल्ह्यात मात्र या सणाला गालबोट लागले आहे. पोळ्याच्या बैल मिरवणुकीत बैल मागे घेण्याच्या वादातून परभणीत दोन ठिकाणी लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ज्यात आठ जण जखमी झाले असुन, दोन्ही ठिकाणी पोलिसांनी तब्बल 53 जणांवर गुन्हा दाखल केलाय.यावेळी घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

शुक्रवारी पोळा सर्वत्र सण साजरा केला जात असताना, धुमधडाक्यात बैलांची मिरवणूक काढली जात होती. मात्र परभणीच्या पाथरी शहरातील पामे गल्लीजवळ दोन मिरवणुका समोरासमोर आल्याने बैल मागे घेण्यावरून वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर क्षणार्धात थेट लाठ्याकाठ्यांनी मारहाणीत झाले.  यात दोन्ही गटातील पाच-सहा जण जखमी झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी 30 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

दुसऱ्या घटनेत अर्धा तास सुरु होता राडा...

पाथरीत झालेल्या या घटनेनंतर दुसरी घटना जिंतुर तालुक्यातील चांदज येथे घडली आहे. गावात पोळ्याची मिरवणुक सुरू असताना मंदिर परिसरात गावातीलच दोन गटातील अनेक जण एकमेकांवर तुटुन पडले. त्यानंतर दगडफेक, काठ्या आणि लाठ्यांनी एकमेकांना मारहाण सुरू झाली. जवळपास अर्धा तास गावात हे दोन्ही गट एकमेकांविरोधात आमने-सामने आलेले होते. यात 2  जखमी झाले आहे. याबाबत माहिती मिळताच बोरी पोलिसांना तात्काळ गावात धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करत परिस्थिती आटोक्यात आणली. दरम्यान दोन्ही गटाकडून देण्यात आलेल्या फिर्यादीवरून बोरी पोलीस ठाण्यात 23 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांचा बंदोबस्त...

पाथरी शहरातील पामे गल्ली आणि जिंतुर तालुक्यातील चांदज येथे झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी दोन्ही ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी पोलिसांनी तात्काळ पोहचत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा वाद टळला आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल करत वाद घालणाऱ्यांना अटक केली आहे. तसेच दोन्ही ठिकाणी वाद झालेल्या घटनास्थळी बंदोबस्त वाढवला आहे. तर गावातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

महत्वाच्या बातम्या...

Parbhani News : परभणीतील तरुण उद्योजकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, बॅडमिंटन खेळून बसल्यानंतर कोर्टवरच हार्ट अटॅक

Parbhani : चालत्या बसची चाक निखळली, सुदैवाने अनर्थ टळला; परभणीतील वसमत रस्त्यावर घडला गंभीर प्रकार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीनंतर होणार स्थानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी जाहीर होणार
दिवाळीनंतर होणार स्थानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी जाहीर होणार
Mumbai Metro : तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेली मेट्रो पुन्हा सुरू, अंधेरी ते दहिसर मार्ग पुन्हा सुरू
तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेली मेट्रो पुन्हा सुरू, अंधेरी ते दहिसर मार्ग पुन्हा सुरू
BMC : मुंबई महापालिकेत निवडणुकीपूर्वी खांदेपालट, चार नवे सहायक आयुक्त दाखल, 5 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
मुंबई महापालिकेत खांदेपालट, चार नवे सहायक आयुक्त दाखल, 5 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीनंतर होणार स्थानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी जाहीर होणार
दिवाळीनंतर होणार स्थानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी जाहीर होणार
Mumbai Metro : तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेली मेट्रो पुन्हा सुरू, अंधेरी ते दहिसर मार्ग पुन्हा सुरू
तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेली मेट्रो पुन्हा सुरू, अंधेरी ते दहिसर मार्ग पुन्हा सुरू
BMC : मुंबई महापालिकेत निवडणुकीपूर्वी खांदेपालट, चार नवे सहायक आयुक्त दाखल, 5 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
मुंबई महापालिकेत खांदेपालट, चार नवे सहायक आयुक्त दाखल, 5 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार
kolhapur Municipal Corporation: कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम पालिकेचे अधिकारी करत आहेत का? पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यांना झापलं
कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम पालिकेचे अधिकारी करत आहेत का? पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यांना झापलं
'नवऱ्याचे 19 महिलांशी संबंध, बेडरुमला स्पाय कॅम लावत नाजूक क्षणांचे ते व्हिडिओ परदेशातील मित्राला पाठवून देत..', अवघ्या दहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बायकोचा सनसनाटी आरोप
'नवऱ्याचे 19 महिलांशी संबंध, बेडरुमला स्पाय कॅम लावत नाजूक क्षणांचे ते व्हिडिओ परदेशातील मित्राला पाठवून देत..', अवघ्या दहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बायकोचा सनसनाटी आरोप
पतंजली आणि भारतीय हॉकीचा एकत्र प्रवास, राष्ट्रीय गौरवाला नव्या शिखरावर पोहोचवण्याचा प्रवास
पतंजली आणि भारतीय हॉकीचा एकत्र प्रवास, राष्ट्रीय गौरवाला नव्या शिखरावर पोहोचवण्याचा प्रवास
Share Market Update : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्समध्ये 213 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांचा एका दिवसात 2.5 लाख कोटींचा फायदा
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्समध्ये उसळी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, अडीच लाख कोटींचा फायदा
Embed widget