एक्स्प्लोर
Advertisement
Panga Movie Review | हा पंगा घ्यायलाच हवा!
पहिल्या फ्रेमपासून सिनेमा खिळवून ठेवतो. नुसता खेळवत नाही तर हृद्यात हात घालतो. गोष्टीला धरून सिनेमा पुढे जातो आणि प्रेक्षकाला हसवत, खेळवत कधी रडवतो.. कधी हुरूप आणतो कधी आनंद देतो तर कधी स्वत:कडे पाहायला लावतो.
तुम्ही या सिनेमाचा ट्रेलर पाहिला असेल तर तुम्हाला वाटेल की हा स्पोर्ट्स मूव्ही आहे. म्हणजे, यापूर्वी दंगल, भाग मिल्खा भाग, मेरी कोम असे जे सिनेमे आले त्या पठडीला हा सिनेमा आहे की काय.. पण तसं नाहीय. म्हणजे, या सिनेमात खेळ नाहीय असं नाही. पण हा फक्त खेळावर बेतलेला सिनेमा आहे. उलट तसं म्हणून आपण या सिनेमाचं महत्व खूप कमी करतो. हा सिनेमा त्या पलिकडचा आहे. म्हणजे, घरातल्या प्रत्येक महिलेवर बेतणारा हा सिनेमा आहे. शिवाय फक्त तिचा नाही. तर ती महिला ज्या कुटुंबात राहात असेल त्या कुटुंबाचा हा सिनेमा आहे. शिवाय अश्विनी अय्यर तिवारी ही दिग्दर्शिका आहे. त्यांनी या पूर्वी नील बटे सन्नाटा, शुभमंगल सावधान असे सिनेमे केले आहेत. सिनेमाची पटकथा दंगलचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांची आहे. इतकं पुरेसं नाहीय का? म्हणूनच हा पंगा घ्यायला हवा.
स्त्रीने घराला घरपण येतं म्हणतात. घरातली स्त्री कमावती असेल तर तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा आणि ती गृहिणी असेल तर तो वेगळा असं जनरली असतं. कारण गृहिणी काय करते.. घरीच तर असते असं आपल्याल वाटतं. पण प्रत्येक माऊलीने मग ती नोकरीसाठी घराबाहेर पडणारी असो किंवा गृहिणी.. आपल्या कुटुंबासाठी प्राधान्याने वेळ देत असते. लग्नापूर्वी किंबहुना ती आई होण्यापूर्वी तिचं आयुष्य वेगळं असतं आणि आई झाल्यानंतर तिचं एकमेव विश्व होतंं ते म्हणजे तिच नवरा आणि मूल. अशाच माजी खेळाडूची ही गोष्ट आहे. फक्त तिचं खेळ खेळण्याचं स्वप्न पून्हा एकदा उचल खातं आणि तिच्या जबाबदाऱ्या, नोकरी आदीशी ती कसा पंगा घेते ते सिनेमातून मांडलं आहे.
कबड्डीमध्ये राष्ट्रीय संघाची कप्तान असलेली मुलगी लग्न करते आणि तिला दिवस जातात. आई बनल्यानंतर तिचा प्राधान्यक्रम बदलतो आणि ती आपल्या कुटुंबात रमते. खेळाच्या कोट्यातून मिळालेली नोकरी असतेच. नोकरी घर आणि नवरा-मूल इतकंच तिचं विश्व असतं. तिचं सर्वस्व असलेला कबड्डी खेळ हा तिच्यापासून दूर असतो. पण निमित्त होतं आणि ती पुन्हा या खेळाकडे वळते आणि संघात कमबॅक करायचं स्वप्न बाळगते. अशावेळी ती, तिचं कुटुंब, तिची नोकरी आणि तिचा खेळ या चौकटीशी ती कशी पंगा घेते आणि झेप घेते ते या सिनेमातून दिसंत.
पहिल्या फ्रेमपासून सिनेमा खिळवून ठेवतो. नुसता खेळवत नाही तर हृद्यात हात घालतो. गोष्टीला धरून सिनेमा पुढे जातो आणि प्रेक्षकाला हसवत, खेळवत कधी रडवतो.. कधी हुरूप आणतो कधी आनंद देतो तर कधी स्वत:कडे पाहायला लावतो. मुळात सिनेमाची गोष्ट सोपी नेटकी त्यावर कसून बांधलेली पटकथा, खुसखुशीत संवाद यांमुळे लेखनाच्या पातळीवर सिनेमाने आपला जम बसवला आहे. याला अलंकृत केलं आहे ते कंगना आणि जसदिप सिंग, रिचा चढ्ढा यांनी. कंगना ही मोठ्या पडद्यावरची राक्षस आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कुटुंब सर्वस्व मानणारी स्त्री, एक आई आणि पत्नी या तीनही भूमिका तिने फारच सुरेख साकारल्या आहेत. उत्तरार्धात येणाऱ्या खेळात तर तिने बहार आणली आहे. जसदीप हा गायक नटही देखणा आणि खूपच उबदार आहे. शिवाय रिचा, नीना गुप्ता काबीले तारीफ.
पंगा हा सर्वांग सुंदर चित्रपट आहे. त्याला पार्श्वसंगीताने तितकीच मजा आणली आहे. ले पंगा आणि जुगनू ही गाणी श्रवणीय. यातली गाणी म्हणजे एक सुंदर अल्बम आहे. हा सिनेमा प्रत्येक घराने आणि घरातल्या प्रत्येकाने पाहायला हवा. म्हणूनच पिक्चरबिक्चरमध्ये या सिनेमाला आपण देतो आहोत चार स्टार. हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन जरूर पहा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement