एक्स्प्लोर

पालघरमध्ये वाढवण बंदराजवळ रिलायन्स 880 एकर जमिनीमध्ये टेक्सटाईल पार्क उभारणार,एमआयडीसीकडून हालचाली सुरु

Reliance Textile Park : प्रस्तावित वाढवण बंदराच्या  जवळ 1200 एकर वर रिलायन्सकडून टेक्सटाईल पार्क उभारलं जाणार आहे. यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु आहेत. 

पालघर  : पालघरमध्ये प्रस्तावित वाढवण बंदराजवळ माहीम व टोकराळे परिसरातील महसूल विभागाच्या ताब्यात असणाऱ्या 880 एकर जमिनीचे पास थ्रू पद्धतीनं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून भूसंपादन करण्यात आलं होतं. एमआयडीसीच्यावतीनं ही जमीन  रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला टेक्स्टाईल पार्कसाठी दिली जाण्याची शक्यता आहे. एमआयडीसीकडून त्याबाबतचा अर्ज पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याची माहिती आहे.प्रस्तावित वाढवण बंदराजवळ रिलायन्सच्या टेक्स्टाईल पार्कबाबत 6 सप्टेंबर अन् 11 सप्टेंबरला राज्याच्या उपमुख्यमंत्री कार्यालयात बैठक झाल्याची माहिती आहे.

रिलायन्सचा एमआयडीसीसोबत पत्रव्यवहार

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्यावतीनं टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीसाठी जमिनीच्या मागणीसाठी एमआयडीसीकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. 16 सप्टेंबर अन् 21 सप्टेंबरला पत्र एमआयडीसीला पाठवण्यात आली आहेत. पालघर तालुक्यातील टोकराळे (केळवे रोड) येथील सर्वे नंबर 6, 8, 10, 11, 12अ, 13, 14, 31, 33 व 34 मधील 112 हेक्टर म्हणजेच 276 एकर आणि माहीम गावातील सर्व्हे नंबर 835/1 मधील 63 हेक्टर म्हणजेच 155 एकर आणि सर्व्हे नंबर 836 मधील 117 हेक्टर म्हणजेच 289 एकर  जमीन याशिवाय माहीम गावादील सर्व्हे नंबर 974 मधील 45.5 हेक्टर 111 एकर जमीन टेक्स्टाईल पार्कसाठी मागण्यात आली आहे. 

पाण्याची आवश्यकता

या नियोजित टेक्स्टाईल पार्कसाठी दररोज सुमारे 65 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून त्यासाठी अस्तित्वात असणाऱ्या काही बंधाऱ्यामधून तर काही नवीन बंधारे उभारण्याच्या दृष्टीने विचार विनिमय केला जात आहे. या टेक्सटाईल पार्कला दळणवळणाच्या दृष्टीने पालघर येथून रुंद रस्ते उभारण्याची आवश्यकता भासणार असून त्यादृष्टीने देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. 

सर्व्हे नंबर 835 व 836 या ठिकाणी काही प्रमाणात वन विभागाची जमीन किंवा संरक्षित वन असल्याची शक्यता असून त्या संदर्भात महसूल विभाग कागदपत्रांचा अभ्यास करित आहे. संबंधित जमिनीच्या सात-बारा उताऱ्यांवर प्रत्यक्षात वन विभागाच्या नोंदी नसल्या तरीही प्रत्यक्षात त्या ठिकाणी काही प्रमाणात कांदळवन असल्याचे दिसून आले आहे. शिवाय लगतच्या मिठागरांसाठी समुद्राच्या पाणी पुरवणारे खाडी क्षेत्र या भागात असल्याने सागरी नियमन क्षेत्र (सीझेडएमपीएस) कायद्यामुळे किती क्षेत्र बाधित होऊ शकेल याचा देखील अभ्यास केला जात आहे. टेक्सटाईल पार्कच्या उभारणीमुळे या भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याची शक्यता असली तरीही मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्मित होत असल्याने मासेमारीवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, जमीन हस्तांतर पार झाल्यानंतर राज्य शासन अन् एमआयडीसीला किती मोबदला मिळणार हे समोर आलेलं नाही.

इतर बातम्या :

वाढवण बंदराजवळ मोठं टेक्सटाईल पार्क उभारण्यासाठी हालचाली; 1200 एकर जमीन भूसंपादन; कोणत्या गावाची जमीन जाणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour D Gukesh World Chess Champion : युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा 'राजा'Zero Hour Arvind Sawant : One Nation One Election विधेयकाला ठाकरेंची शिवसेना विरोध करणार?Zero Hour Sharad Pawar Ajit Pawar Meet : शरद पवारांचा वाढदिवस... दादांची भेट; राष्ट्रवादीत मनोमिलन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Embed widget