एक्स्प्लोर

वाढवण बंदराजवळ मोठं टेक्सटाईल पार्क उभारण्यासाठी हालचाली; 1200 एकर जमीन भूसंपादन; कोणत्या गावाची जमीन जाणार?

Vadhavan Port: पालघर जिल्ह्यातील माहीम आणि टोकराळे गावातील जमीन भूसंपादन करण्यात येणार आहे. 

Vadhavan Port: पालघर तालुक्यातील डहाणूमधील वाढवण बंदर (Vadhavan Port) उभारण्यासाठी शासनाने जय्यत तयारी सुरु केली आहे. वाढवण बंदरासाठी रस्ता तसेच रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. वाढवण बंदराजवळ मोठं टेक्सटाईल पार्क (Textile Park) उभारण्यासाठी हालचाली सुरु आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील 1200 एकर जमीन भूसंपादन केली जाणार आहे. 

पालघर जिल्ह्यातील माहीम आणि टोकराळे गावातील जमीन भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी बांधकाम विभाग आणि एमआयडीसी विभागाच्या अधिकारी यांचा सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. वाढवण बंदराच्याजवळ (Vadhavan Port)  हा प्रकल्प उभा केल्याने निर्यातीसाठी सुलभता येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा प्रकल्प खाजगी उद्योजक चालवणार की सरकार यात अद्याप स्पष्टता नाही. या टेक्सटाइल पार्कसाठी मोठे रस्ते बांधण्यासाठी ही बांधकाम विभागाच्या हालचाली सुरू आहेत. या प्रकल्पासाठी 65 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असुन नविन पाण्याचे बंधारे ही बांधले जाणार आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या बैठका-

पालघर तालुक्यात दुग्ध व्यवसाय विभागाकडे टोकराळे (केळवे रोड) येथील सर्वे नंबर 6,8,10,11,12 अ,13,14,31,33 व 34 मधील 112 हेक्टर व माहीम गाकतील सर्व्हे नंबर 835/1 (63 हेक्टर) व 836 (111 हेक्टर) या जागांसह लगतच्या भागातील शासकीय जागांमध्ये टेक्स्टाइल पार्क उभारण्याचे विचाराधीन आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात एमआयडीसी, पाटबंधारे विभाग, वन विभाग, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या बैठका होत असून विभागनिहाय स्थळपाहणीही करण्यात आली आहे.

कोस्टल रोड वाढवण बंदराला जोडणार?

मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाढवण बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा मानस असल्याचं सांगण्यात येत आहे. पालघरमध्ये विमानतळ बांधण्याबाबत जमिन आणि (Feasibility Report) साध्यता अहवाल एकनाथ शिंदेंकडून मागवण्यात आली आहे. वाढवण बंदर, विमानतळ आणि कोस्टल रोडशी जोडल्यास तिथे कनेक्टिविटी वाढून त्या भागाचा विकासही मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होणार आहे.

वाढवण बंदर प्रकल्प नेमका काय?

सध्या महाराष्ट्रात दोन प्रमुख बंदरं आहेत. यातील एक मुंबई बंदर आणि दुसरं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदर. मात्र जेएनपीटीएने मुंबई शहराचा विकास आणि काही भौगोलिक कारणांमुळे या बंदरात अधिकची वाहतूक करणं शक्य नाही. तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची कंटेनर हाताळण्याची क्षमताही संपत चालली आहे, असे सांगितले आहे. तसेच देशातील निर्यात व आयात क्षेत्रात होणारी वाढ पाहता भविष्यात दुसऱ्या बंदराची गरज लागू शकते. त्यामुळेच पालघर जिल्ह्यातील वाढवण परिसरात एक नवीन बंदर उभारण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सागरी मंडळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या दोन संस्था एकत्र काम करत आहे.

संबंधित बातमी:

कोस्टल रोड वाढवण बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा विचार; विमानतळही बांधणार, एकनाथ शिंदेंनी मागवला अहवाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
Embed widget