एक्स्प्लोर

फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट

स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, कोणसई परिसरात हा कारखाना अनधिकृतपणे सुरू होता.

पालघर : जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या फटाके (Fireworks) बनवणाऱ्या कारखान्यात आज भीषण स्फोट (Blast) झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून भावेश दिलीप वावरे (वय 25) आणि मोनिका सचिन पडवळे (रा.पालसई वय अंदाजे 30 वर्षे) असे मृत कामगारांचे नाव आहे. तर, तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींमध्ये मोनिका पडवळे, मोनिका जाधव, अर्चना मिसाळ आणि जयश्री रावते यांचा समावेश असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. संबंधित कारखान्यात (Palghar) एकूण सुमारे 32 कामगार काम करत असल्याची माहिती मिळत आहे. 

स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, कोणसई परिसरात हा कारखाना अनधिकृतपणे सुरू होता. या कारखान्यात सुतळी बॉम्ब, त्याचप्रमाणे इतर फटाक्याचं उत्पादन होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सण-उत्सव आणि विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन वाडा तालुक्यात अशा बेकायदेशीर कारखान्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः सुतळी बॉम्ब आणि इतर धोकादायक फटाके बनवण्याचे काम कोणतीही सुरक्षा उपाययोजना किंवा परवानगी न घेता सुरू असल्यामुळे कामगारांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, प्रशासन आणि पोलिसांच्या कथित दुर्लक्षामुळे किंवा मूकसंमतीमुळे असे कारखाने बिनधास्तपणे सुरू आहेत. यापूर्वीही अशा घटनांची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. घटनेनंतर स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यास काही अडचणी निर्माण झाल्याचे समजते. या घटनेमुळे संपूर्ण वाडा तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वाडा तालुक्यात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत फटाके कारखान्यांवर तातडीने कारवाई करून त्यांना बंद करण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे संकेत दिले असून पुढील तपास सुरू आहे.

स्फोटात दोन मृत्यू, तीन कामगार गंभीर

 1.भावेश दिलीप वावरे, रा.जामघर वय अंदाजे  वर्षे
 2.मोनिका सचिन पडवळे, रा.पालसई वय अंदाजे 30 वर्षे

जखमी व्यक्ती 

वाडा येथील दवाखान्यात दाखल
1.मोनिका मोहन वारदी , रा.कोनसई वय अंदाजे 25 वर्षे                    

2.जागृती जगदीश गवते , रा.जामघर वय अंदाजे 27वर्षे  

3.प्रतिभा प्रताप पवार, रा.कोनसई, वय 30 वर्षे 

हेही वाचा

 ठाण्यातील 'तो' वादग्रस्त सरकारी अधिकारी निघाला अशोक खरातचा कट्टर भक्त, महिलेला भोंदूबाबाच्या नाशिकमधील कार्यालयात नेलं अन्...; हादरवणारी माहिती समोर

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Embed widget