एक्स्प्लोर

Ashok Kharat Crime News: ठाण्यातील 'तो' वादग्रस्त सरकारी अधिकारी निघाला अशोक खरातचा कट्टर भक्त, महिलेला भोंदूबाबाच्या नाशिकमधील कार्यालयात नेलं अन्...; हादरवणारी माहिती समोर

Ashok Kharat Crime News: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांचा पसारा आता ठाण्यापर्यंत विस्तारल्याचे समोर आले आहे.

Ashok Kharat Crime News: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कृत्यांचा पसारा आता ठाण्यापर्यंत (Thane) विस्तारल्याचे समोर आले आहे. ठाणे महानगरपालिकेतील वादग्रस्त अधिकारी महेश अहेर (Mahesh Aher) हा खरातचा कट्टर भक्त असून, त्याने पालिकेतील एका लिपिक महिलेला खरातच्या जाळ्यात ओढल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे गुन्हे शाखा (Crime Branch) याचा अधिक तपास करत आहे.

Ashok Kharat Crime News: नाशिकच्या कार्यालयात नेऊन अघोरी कृत्य

तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, महेश अहेर याने तिला नाशिक येथील अशोक खरातच्या 'ओकस' कार्यालयात नेले होते. तिथे त्या महिलेच्या इच्छेविरुद्ध अहेर आणि खरात या दोघांनी तिच्यावरून लिंबू उतरवून अघोरी कृत्य केले. इतकेच नाही तर तिला 'मोती' हा खडा घालण्यास सक्ती केली. दैवी शक्तीच्या नावाखाली या महिलेवर मानसिक दडपण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Ashok Kharat Crime News: व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आणि वारंवार अत्याचार

पीडित महिलेने केलेल्या तक्रारीत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. महेश अहेर याने तिला कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. या कृत्याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. या ब्लॅकमेलिंगच्या जोरावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

Ashok Kharat Crime News: आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी दिला होता चोप

दरम्यान, महेश अहेर हा ठाणे महानगरपालिकेतील अत्यंत वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळखला जातो. काही काळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या मुलीबाबत चुकीचे वक्तव्य केल्याच्या आरोपावरून आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी त्याला पालिका मुख्यालयाबाहेर मारहाण केली होती. या प्रकरणी अनेक कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई देखील झाली होती. आता थेट एका भोंदू बाबासोबत मिळून महिलेचे शोषण केल्याचा आरोप झाल्याने अहेरच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sushma Andhare on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस, तुम्ही महिलांना तुच्छ लेखता, तुमच्यात चांगदेवाचा अहंकार भरलाय; सुषमा अंधारेंची टीका, मुख्यमंत्र्यांचं 'ते' आव्हानही स्वीकारलं

Ashok Kharat Crime News: अशोक खरातचा नवा कारनामा उघड,एकाच व्यक्तीच्या नावे 32 बनावट खाती उघडून 57 लाखांची अफरातफर; आणखी एक गुन्हा दाखल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक 
Maharashtra Live Blog Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक 
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: अशोक खरातसोबत केलेल्या पूजाविधी नेमक्या कोणत्या होत्या?, तेजस्वी सातपुतेंचे धडाधड प्रश्न; रुपाली चाकणकर म्हणाल्या...
खरातसोबत केलेल्या पूजाविधी नेमक्या कोणत्या होत्या?,सातपुतेंचे धडाधड प्रश्न; चाकणकर म्हणाल्या...
Pune Crime Nasrapur Case: जिथे स्वातंत्रवीर सावकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली, तिथेच नराधमांची होळी व्हावी; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
जिथे स्वातंत्रवीर सावकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली, तिथेच नराधमांची होळी व्हावी; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
OBC Cast Issue : काना, मात्रा चुकला, आरक्षणाला मुकला, 27 जातींना आरक्षणाची प्रतीक्षा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
Embed widget