Palghar Crime: मुलगा होईल वाटलेलं पण पोटी मुलगीच आली; अवघ्या पाच दिवसांच्या चिमुकलीचा आईनंच घोटला गळा
Palghar Crime: तिसरा मुलगा होईल असं वाटलेलं पण पोटी मुलगीच आली, यामुळे संतापलेल्या आईनं आपल्या पोटच्या चिमुकलीचा गळा घोटून निर्घुण हत्या केली आहे.
Palghar Crime News: पालघर : तिसरी मुलगी झाल्यानं संतापलेल्या आईनं आपल्या पोटच्या पाच दिवसांच्या चिमुकलीची गळा घोटून हत्या केली. पालघरमधील (Palghar News) तारापूर (Tarapur) परिसरात आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तारापूर पोलिसांनी निर्दयी आईला अटक केली असून पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पालघरमधील तारापूरमध्ये तिसरी मुलगी झाल्यानं आईनंच पाच दिवसीय चिमुकलीची हत्या केल्याची घटना घडली आहे. श्रेया प्रभू (वय 32 वर्ष) या विवाहितेला आधीपासूनच दोन आपत्य होती. त्यातील पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा होता. अशातच आरोपी महिला तिसऱ्यांदा गरोदर राहिली. आपल्याला तिसऱ्यांदा मुलगाच होईल अशी तिला अपेक्षा होती. मात्र मुलगी झाल्यानं तिच्या स्वप्नांचा हिरमोड झाला आणि तिला राग अनावर झाला. संतापलेल्या आरोपी आईनं कोणताही विचार न करता आपल्या पोटच्या मुलीचा जीव घेतला.
मातृत्वाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पालघरच्या तारापूर परिसरात उघडकीस आली आहे . तारापूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या घेवली या गावात श्रेया प्रभू या विवाहितेला पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा झाला होता. मात्र तिसऱ्यांदा आपल्याला मुलगाच होईल, अशी अपेक्षा या निर्दयी मातेला होती. मात्र मुलगी झाल्यानं तिनं अवघ्या पाच दिवसांच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याशिवाय हत्येचा पुरावा सापडू नये म्हणून या निर्दयी मातेनं आपल्या चिमुकल्या मुलीचा मृतदेहही नदीत फेकला होता.
नेमकं घडलं काय?
पालघरच्या तारापूरमध्ये राहणाऱ्या श्रेया प्रभू या विवाहितेच्या पोटी तिसऱ्या अपत्यानं जन्म घेतला. या विवाहितेला पहिली मुलगी, दुसरा मुलगा होता आणि आपल्या तिसराही मुलगाच होईल, अशी तिची अपेक्षा होती. पण तिच्या पोटी मुलीनं जन्म घेतला. आपल्या अपेक्षांवर पाणी फिरलं, आपण पाहिलेली स्वप्न आता अधुरीच राहणार या विचारानं आरोपी आईला संताप अनावर झाला. तिनं कोणताही मागचा पुढचा विचार न करता अवघ्या पाच दिवसांच्या पोटच्या चिमुकलीच्या हत्येचा कट रचला. तसेच, कोणताही पुरावा हाती लागू नये म्हणून तिनं आपल्या पाच दिवसांच्या बाळाचा मृतदेह नदीत फेकून दिला. तीन दिवसांपूर्वी जन्म झालेल्या बाळाच्या तपासणीसाठी आशा सेविका आरोपी श्रेया प्रभू हिच्या घरी गेली असता आरोपीनं त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे चौकशी केली असता. शेजारच्यांनी महिला घराबाहेर आपल्या चिमुकल्या मुलीसह गेली, मात्र परतताना एकटीच घरी परतल्याचं कळालं. शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर आशा सेविकेचा संशय बळावला. यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, सदर घटनेची माहिती तारापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळा आरोपी आईला अटक केली आणि तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं क्रूर आईला पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :