एक्स्प्लोर

Palghar News: चक्क विहीर चोरीला गेली! 'पेसा'तून निधी खर्च, पण विहीर गेली कुठं, स्थानिकांचा सवाल

Palghar News:  विहिरीसाठी 'पेसा' तून निधी देण्यात आला, मात्र विहीरच जागेवर नसल्याने स्थानिकांकडून भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात येत आहे.

Palghar News:  भ्रष्टाचाराविरोधात कायदा असला तरी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येताना दिसतात. भ्रष्टाचारासाठी अनेकदा विविध मार्ग वापरले जातात. पालघर जिल्ह्यातील (Palghar) डहाणू (Dahanu) तालुक्यातील एका गावात असाच एक प्रकार समोर आला आहे. विहिरीचे काम न करताच 82 हजाराच्या निधीवर डल्ला मारला असल्याचा आरोप करण्यात येत  आहे. डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उर्सेमध्ये 'पेसा' निधीमधून एक विहीर मंजूर करण्यात आली होती. मात्र, विहीर जागेवर नसल्याचे म्हटले जात आहे.

उर्से आंबाडी पाडा येथील विहिरीचे काम ग्रामपंचायत पेसा योजनेतून मंजूर होउन या कामासाठी दोन लाख 50 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर निविदा प्रक्रियेद्वारे  काम वाटप होऊन काम सुरू करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र ठेकेदाराकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात न करताच एका बांधकाम साहित्याचा पुरवठा करणाऱ्या वाघोबा ट्रान्सपोर्ट नावाच्या खात्यावर ग्रामपंचायतीच्या तिजोरीतून 82 हजारांचा धनादेश देण्यात आला. 

हा धनादेश कामाचे कंत्राट घेणारी व्यक्ती किंवा एजन्सीच्या नावे देणे आवश्यक आहे. मात्र, बांधकाम साहित्य पुरविणाऱ्या व्यक्तीच्या नावे देण्यात आल्याने यात मोठं गौडबंगाल असल्याचा आरोप केला जात आहे. प्रस्तावित विहिरीच्या ठिकाणी बांधकाम साहित्य टाकलं गेल्याचं सांगण्यात येतं आहे. मात्र प्रत्यक्षात जागेवर ना विहिरीचे खोदकाम झाले, ना विहिरीच्या बांधकामासाठी लागणारी साधन सामग्री टाकण्यात आली आहे. 'पेसा' निधीतून आदिवासी नागरिकांची तहान भागविण्यासाठी बांधण्यात येणारी विहीर देखील तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने लुटून खाण्याचा हा प्रकार गंभीर असल्याने यात सामील सर्वांची सखोल चौकशी करून फसवणूक केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आंबाडी पाड्यातील आदिवासी ग्रामस्थांनी केली आहे.

अधिकाऱ्यांनी काय म्हटले?

उर्से आंबडी पाडा येथे नवीन विहिरीचे खोदकाम करण्यात आले होते त्यावेळी या ठिकाणी विहीर बांधण्यासाठी लागणारी साधन सामग्री ठेवली होती परंतु आता माझी दुसऱ्या ठिकाणी बदली झाल्याने सध्या स्थितीमध्ये विहिरच्या कामा संदर्भात माहिती नाही असे उर्से ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले. तर, उर्से आंबाडी पाडा येथे ग्रामपंचायत पेसा निधीतून मंजूर विहिरीच्या जागेचे स्थळ पाणी करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात येणार असल्याचे सध्याचे ग्रामविकास अधिकारी किशोर आक्रे यांनी सांगितले.
 
उर्से आंबडी पाडा येथे पेसा निधीत गैरव्यवहार झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे . विहीर न बांधता त्या जागेवर फक्त एक ट्रक डब्बर टाकून 80 हजार रुपये लाटला असून आम्ही पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सदर ठेकेदार व ग्रामविकास अधिकारी यांच्या वर्ती गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत, असे तक्रारदार आशिष चव्हाण यांनी सांगितले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवादMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
Sharad Pawar Speech: शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
×
Embed widget