(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात; कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू
Palghar Accident News: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून कार आणि लक्झरी बसमध्ये धडक झाल्यानं अपघात झाला.
Palghar Accident News: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. कार (Car Accident) आणि लग्झरी बसची (Luxury Bus Accident) धडक होऊन अपघात (Palghar Accident News) झाला. कारचालकाचं नियंत्रण सुटल्याने कारनं बसला धडक (Car Collided With Bus) बसली आणि हा अपघात झाला. गुजरातहून (Gujarat) मुंबईच्या (Mumbai News) दिशेनं जाणाऱ्या या मार्गावर हा अपघात झाला आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरातहुन मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात झाला. कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कारची लग्झरी बसला धडक बसली. गुजरातहुन मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाच नियंत्रण सुटल्यानं विरुद्ध दिशेनं येणाऱ्या लक्झरी बसवर कार धडकली. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की, कारमधील सर्वच्या सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील सर्व प्रवाशी गुजरातच्या बारडोलीमधील राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर बसमधील तीन प्रवासी अपघातात किरकोळ जखमी झाले.
कासा पोलीस ठाणे हद्दीत आज पहाटे हा अपघात झाला. कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं गुजरात लेनवर जाऊन गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या लग्झरी बसनं समोरासमोर ठोकर मारल्यानं हा अपघात झाला. सदर अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद अब्दुल सलाम हाफिसजी (वय 36 वर्ष), इब्राहिम दाऊद (वय 60 वर्ष) आसिया बेन कलेक्टर (वय 57 वर्ष) इस्माईल महंमद देसाय (वय 42 वर्ष) अशी अपघात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावं आहेत. तर लग्झरीमधील तीन प्रवाशांना अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघात कासा पोलीस स्टेशन हद्दीत महालक्ष्मीजवळ झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू केलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाहीसाठी सर्व मतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
अपघात झाल्यानंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व माहिती घेऊन वाहतूक तात्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अपघातग्रस्त वाहानं क्रेनच्या मदतीनं महामार्गावरुन बाजूला करण्यात आली. त्यानंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.