एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: पहलगाममधील हॉटेल्सची दहशतवाद्यांकडून झाली होती रेकी; एप्रिलच्या सुरुवातीलाच गुप्तचर यंत्रणेकडून दिलेला अलर्ट

Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली होती.

Pahalgam Terror Attack: पहलगाम हदशतवादी हल्ल्याप्रकरणी (Pahalgam Terror Attack) एनआयएच्या तपासाला वेग आला आहे. एनआयकडून खोऱ्याचं 3D मॅपिंग करण्यात आलं असून मोबाइल डंप डेटा देखील ताब्यात घेतला आहे. तसेच 2 हजार 800 हून अधिक लोकांची चौकशी देखील करण्यात आली आहे. यासोबत एक महत्वाची माहिती देखील समोर आली आहे.

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली होती, एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच तसा अलर्ट देण्यात आला होता अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. एवढच नव्हे तर पहलगाममधील एका मोठ्या हॉटेलवर दहशतवादी हल्ला करणार होते. दहशतवाद्यांनी पहलगामबरोबरच आरू, बेताब या ठिकाणी रेकी देखील केली. धक्कादायक म्हणजे मार्च महिन्याच्या अखेरीस दहशतवादी गुलमर्गमध्ये पोहोचले होते. मात्र तिकडे कडक सुरक्षा असल्याने ते दक्षिण काश्मीरकच्या दिशेनं वळले, अशी माहिती समोर आली आहे. 

दहशतवाद्यांविरुद्ध यूएपीए आणि बीएनएसनुसार गुन्हे दाखल-

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याशी संबंधित एफआयआर एबीपी 'माझा'च्या हाती लागला आहे. या एफआयआरमध्ये हल्ल्याचा तपशीलवार घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. 22 एप्रिलला दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी सुरु झालेला हल्ला 2 वाजून 20 मिनिटांपर्यंत सुरु होता. हल्ल्यानंतर 10 मिनिटांत म्हणजे दुपारी अडीच वाजता एफआयआर दाखल झाला. दहशतवाद्यांना पाकस्थित सूत्रधारांकडून सूचना मिळत होत्या, असंही एफआयआरमध्ये म्हटलंय. हल्ल्यासाठी बेकायदेशीरपणे मिळवलेले ऑटोमॅटिक हत्यारे वापरण्यात आली. दहशतवाद्यांविरुद्ध यूएपीए आणि बीएनएसनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

भारतावर आता सायबर युद्ध थोपवण्याचा प्रयत्न सुरू-

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतावर आता सायबर युद्ध थोपवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. महाराष्ट्र सायबर सेलने सादर केलेल्या 'इकोज ऑफ पहलगाम' या अहवालात, 23 एप्रिलपासून देशभरात सुमारे 10 लाख सायबर हल्ले झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारतावर हे सायबर हल्ले पाकिस्तान, मध्य पूर्व, मोरोक्को आणि इंडोनेशियामधून केले जात असल्याचं अहवालात म्हटलंय. स्वतःला इस्लामिक गट म्हणवून घेणाऱ्या सायबर हल्ल्यांमध्ये, टीम इन्सेन पीके, एपीटी गट आघाडीवर आहेत. या हल्ल्यांमध्ये वेबसाइट डिफेसमेंट, सीएमएस एक्स्प्लॉयटेशन आणि कमांड अँड कंट्रोल हल्ल्यांचा समावेश आहे. याशिवाय, बांगलादेशी मिस्ट्रियस टीम आणि इंडोनेशियन गट इंडो हॅक्स सेक देखील सक्रिय आहेत, ज्यांनी भारतीय टेलिकॉम डेटा आणि स्थानिक ऍडमिन पॅनेलना टार्गेट केलंय. महाराष्ट्र सायबरने काही हल्ले रोखले आहेत, परंतु अहवालात भारतीय रेल्वे, बँकिंग आणि सरकारी पोर्टलसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: अमेरिकेने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावले खडेबोल; म्हणाले, आम्ही भारतासोबत, तुम्ही पहलगाम हल्ल्याचा निषेध करा!

Pahalgam Terror Attack: नि. मेजर जनरलचं मोठं भाकीत, मोदी पाकिस्तानचे दोन तुकडे पाडणार, सर्जिकल स्ट्राईकपेक्षा भयंकर हल्ल्याची तयारी!

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News: 8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
Lucky Zodiac Signs : नोव्हेंबरचा शेवटचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; महिन्याच्या शेवटी महादेव होतील प्रसन्न, वाचा तुमची लकी रास
नोव्हेंबरचा शेवटचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; महिन्याच्या शेवटी महादेव होतील प्रसन्न, वाचा तुमची लकी रास
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
Asim Sarode on Delimitation Bill: उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, डिलिमिटेशन बिलापूर्वी 6 बंडखोर खासदारांना बजावला व्हीप; असीम सरोदेंनी म्हणाले, 'थेट कायद्याच्या'
उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, डिलिमिटेशन बिलापूर्वी 6 बंडखोर खासदारांना बजावला व्हीप; असीम सरोदेंनी म्हणाले, 'थेट कायद्याच्या'

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime News: 8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
Devendra Fadnavis Delimitation Bill: शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
Solapur Crime News: मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis: दक्षिणेच्या 75 खासदारांनी समर्थन दिलंय, शरद पवारांच्या पक्षाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पाठिंब्याबाबत स्पष्टच बोलले
दक्षिणेच्या 75 खासदारांनी समर्थन दिलंय, शरद पवारांच्या पक्षाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पाठिंब्याबाबत स्पष्टच बोलले
Delimitation bill Shivsena: भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
Delimitation bill Congress: पिक्चर अभी बाकी है ब्रो! डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी वेगवान हालचाली, काँग्रेस नेत्याचं सूचक ट्विट
पिक्चर अभी बाकी है ब्रो! डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी वेगवान हालचाली, काँग्रेस नेत्याचं सूचक ट्विट
Embed widget