Nagpur Covid Update : सोमवारी जिल्ह्यात फक्त 588 जणांची आरटीपीसीआर चाचणी, शहरात नवे 31 कोरोनाबाधित
नागपूर जिल्ह्यात सोमवारी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 35 असून यात ग्रामीणमधील पाच तर शहरी भागातील 30 बाधितांचा समावेश आहे. याशिवाय शहरातील सक्रिय कोरोना बाधितसंख्या 511 वर पोहोचली आहे.
नागपूरः सोमवारी जिल्ह्यात फक्त 588 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 37 जणांची ग्रामीणमध्ये तर शहरात 551 जणांचा चाचणी करण्यात आली. चाचण्याच कमी झाल्याने कोरोनाचा दैनिक अहवालही कमी आला असून सोमवारी प्राप्त अहवालानुसार फक्त 31 कोरोनाबाधित आढळून आले.
नागपूर जिल्ह्यात सोमवारी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 35 असून यात ग्रामीणमधील पाच तर शहरी भागातील 30 बाधितांचा समावेश आहे. याशिवाय शहरातील सक्रिय कोरोना बाधितसंख्या 511 वर पोहोचली आहे. यात ग्रामीणमधील 150 तर शहरातील 361 बाधितांचा समावेश आहे.
एकूण बाधितांपैकी सध्या 12 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी 8 रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात, 1 रुग्ण किंग्सवे हॉस्पिटलमध्ये, 1 रुग्ण रेल्वे हॉस्पिटलमध्ये, 1 रुग्ण सनफ्लावर हॉस्पिटलमध्ये 1 रुग्ण ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये आणि 1 रुग्णावर मेडिट्रीना रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच 499 रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या