Numerology Today 31 January 2024 : आजचा दिवस 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी अनुकूल; आज धनलाभासह 'हे' शुभ संकेत
Numerology Today 31 January 2024 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या.
![Numerology Today 31 January 2024 : आजचा दिवस 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी अनुकूल; आज धनलाभासह 'हे' शुभ संकेत Numerology Today 31 January 2024 aajche ank jyotish these birth date of people will have a good day and luck today Numerology Today 31 January 2024 : आजचा दिवस 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी अनुकूल; आज धनलाभासह 'हे' शुभ संकेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/30/db8073fb960ae9218889e8ae69eef82f1706605248678713_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Numerology Today 31 January 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.
मूलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मूलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मूलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
मूलांक 1
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 असलेल्या लोकांनी आज स्वत:वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तणावमुक्त राहण्यासाठी ध्यान करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीत चढ-उतार असतील. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. जर तुम्हाला कामाचा खूप ताण वाटत असेल तर काही काळ ब्रेक घ्या.
मूलांक 2
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप भाग्यवान आहे. तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर सुरक्षित प्रवास करा. शैक्षणिक क्षेत्रात आज तुमचा मान-सन्मान मिळेल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे. बरेच दिवसांपासून एखाद्या आजारांनी त्रस्त लोकांची स्थिती सुधारेल.
मूलांक 3
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. जर तुम्ही नैराश्यात असाल तर तणाव कमी करा. कोणीतरी तुम्हाला सल्ला आणि मार्गदर्शन देऊ शकते. आज कामावर जायला उशीर करू नका, कारण वरिष्ठांच्या नजरेत तुम्ही पडू शकता.
मूलांक 4
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. तुमच्यावर रागवलेले लोक आज पु्न्हा मैत्रीचा हात पुढे करू शकतात. आज तुमचं कौटुंबिक जीवन चांगलं राहील. कामावर सहकारी तुम्हाला मदत करतील. तुमची आजची लव्ह लाईफ चांगली असेल.
मूलांक 5
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. आज तुम्ही गुंतवणुकीसाठी काही चांगले पर्याय पहा. तुमची संपत्ती वाढवण्यासाठी काही सकारात्मक पावलं उचलण्यात तुम्ही आज यशस्वी व्हाल. आज तुमची तब्येत उत्तम असेल. मालमत्तेचं कोणतंही प्रकरण सामंजस्याने सोडवलं जाईल. दिवस धकाधकीचा जाईल, संध्याकाळची वेळ तुम्हाला दिलासा देणारी असेल.
मूलांक 6
कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. काही लोक आज नातेवाईकांना भेटण्यासाठी शहराबाहेर जाऊ शकतात. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही गोष्टींना आज हात लावू नका. आज तुमचा दिवस खर्चिक असेल, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.
मूलांक 7
कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 असलेल्या लोकांना आज खूप उत्साही वाटेल. प्रेम जीवनात वाद टाळणे चांगले. तुम्हाला निरोगी वाटेल. आयुष्यातील आव्हानांवर हसतमुखाने मात करा. आज स्वतःला हायड्रेट ठेवायला विसरू नका. कामात संतुलन राखा, करिअरमध्ये रणनीतीसह पुढे जा. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
मूलांक 8
कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 च्या लोकांसाठी आज सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला जातो. अविवाहित लोकांना कोणी खास भेटू शकते, जर तुम्हाला कामाचा खूप ताण वाटत असेल तर काही काळ ब्रेक घ्या. घाईघाईत खर्च करणे टाळा. पैसे येतील पण खर्चही वाढतील. दिवस रोमँटिक असणार आहे.
मूलांक 9
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा असणार आहे. तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याची योजना आखू शकता. तुमचा दिवस घरी किंवा बाहेर मित्रांसोबत चांगला जाईल. आज अतिरिक्त खर्चामुळे मन अस्वस्थ होईल. व्यावसायिक जीवनात तुम्ही प्रगती कराल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)