(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : यशश्री-दाऊदची जुनी ओळख, पण 3-4 वर्षात भेटले नव्हते, भेटल्यानंतर वादातून हत्या, पोलिसांनी घटनाक्रम सांगितला!
Uran Murder Case : मयत आणि आरोपीमध्ये आधीपासून मैत्री होती. मागील तीन ते चार वर्षात मयत आरोपीच्या संपर्कात नव्हती, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी दिली आहे.
मुंबई : उरण येथील 22 वर्षीय तरूणी यशश्री शिंदेची निघृण हत्या (Uran Murder Case) करण्यात आली. यशश्रीची हत्या झाल्यापासून मुख्य आरोपी दाऊद शेख (Dawood Shaikh) फरार होता. अखेर दाऊदला कर्नाटकातून ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यशश्री शिंदे (Yashashree Shinde) हिच्या हत्येचा घटनाक्रम सांगितला आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी सांगितले की, आज गुन्हा दाखल होवून पाच दिवस झाले आहेत. या प्रकरणात नातेवाईक, मित्र, अशा तीन चार जणांवर संशय होता. मुख्य आरोपी दाऊद शेखचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक कर्नाटक येथे गेले होते. आज सकाळी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आली.
यशश्री-दाऊदची जुनी ओळख, पण...
आरोपी दाऊद शेखचे लोकेशन मिळत नव्हते. दाऊदच्या लोकेशनची माहिती त्याच्या मित्राकडून माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार अलर गावातून दाऊदला जेरबंद करण्यात आले. आरोपीने हत्या कबूली दिली आहे. मयत आणि आरोपीमध्ये यांच्यामध्ये आधीपासून मैत्री होती. मागील तीन ते चार वर्षात मयत यशश्री शिंदे आरोपी दाऊद शेखच्या संपर्कात नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
भेटल्यानंतर वादातून हत्या
पोस्टमोर्टममध्ये डॉक्टरांनी सांगितले आहे की, मयत मुलीचा चेहरा कुत्र्यांनी विद्रुप केल्याची शक्यता आहे. या प्रकरणात किडनॅप करून मारलेले नाही. मुलीला आरोपीने बोलावून घेतले होते. दोघेही अनेक वर्षापासून उरणमध्ये राहतात. त्यांची एकमेकांची जुनी ओळख आहे. एकत्र शाळेत होते का? याची माहिती घेतली जात आहे. दोघे एकत्र भेटणार होते. मुलगी भेटल्यावर कदाचित वाद झाला असावा, यातून हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अजून चौकशी बाकी आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीच्या मित्राकडून मिळाली माहिती
दाऊदचा मित्र मोसीम हा मयत यशश्री शिंदे हिच्या संपर्कात होता. पण त्यानेच आरोपीला अटक करण्यात मदत केली आहे. सध्या तरी या प्रकरणात एकच आरोपी असल्याचे समोर येत आहे. यामध्ये अजून चौकशी सुरु आहे. उरणमध्ये राहणारा आरोपी दाऊद करोना काळात कर्नाटकमध्ये गेला होता. तिथे तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याचा मोबाईल अद्याप सापडला नाही. आरोपीला इकडे आणल्यानंतर मोबाईल ताब्यात घेऊ, असे उरण पोलिसांनी म्हटले आहे.
आणखी वाचा