एक्स्प्लोर

Pravin Darekar : नवी मुंबईतही विकासकाशिवाय स्वयं पुनर्विकास यशस्वी होऊ शकतो : प्रवीण दरेकर

Self Redevelopment Scheme : विकासकाच्या हातात गेलेला भाग सभासदांच्या हातात आणण्यासाठी शासकीय योजना उभी करण्यात आली असून त्यासाठी देवेंद्र फडणवीसांची मोलाची मदत मिळाल्याचं आमदार प्रवीण दरेकर म्हणाले.

नवी मुंबई : मुंबईपेक्षा स्वयं पुनर्विकासाची जास्त गरज नवी मुंबईला आहे. नवी मुंबईत वसलेला रहिवाशी कष्टकरी, गिरणी कामगार, माथाडी कामगार आहे. इथे उंच टॉवरमध्ये राहणारा रहिवाशी नाही. 90-95 टक्के लोकं मध्यमवर्गीय आहेत. नवी मुंबईत विकासकाशिवाय स्वयं पुनर्विकास (Navi Mumbai Self Redevelopment Scheme) शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो. परंतु निर्धार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केले आहे.

नवी मुंबईतील सेक्टर 3 येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात नवी मुंबई को-ऑप.हौसिंग फेडरेशनतर्फे पुनर्विकास व स्वयं पुनर्विकास विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आ. प्रविण दरेकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी नवी मुंबई को-ऑप.हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सुनिल चौधरी, सचिव भास्कर म्हात्रे, सतिश निकम, श्रीप्रसाद परब, प्रमोद जोशी यांसह मोठ्या संख्येने गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी, नवीमुंबईकर नागरिक उपस्थित होते.

नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाचा कार्यक्रम

यावेळी मार्गदर्शन करताना आ. प्रविण दरेकर म्हणाले की, "हा कार्यक्रम नवी मुंबईसाठी महत्त्वाचा आहे. आपला उत्साह पाहिल्यावर स्वयं पुनर्विकास ही नवी मुंबईकरांची गरज असल्याचे दिसून येतेय. स्वयं पुनर्विकास आज होत नाही. मी फक्त त्याला आकार देण्याचे काम केलं आहे. विकासकाच्या हातात गेलेला भाग सभासदांच्या हातात आणण्यासाठी शासकीय योजना उभी केली. स्वयं पुनर्विकासाला रचनात्मक साच्यात बसविण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने मी करत आहे."

देवेंद्र फडणवीसांची मोलाची मदत

प्रविण दरेकर पुढे म्हणाले की, मुंबई बँकेच्या माध्यमातून मुंबईत ही योजना सुरु केली, कर्ज धोरणही आणले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीच्या काळात स्वतः लक्ष घालून शासन दरबारी परवानग्या देण्याचे काम केले. जिथे जिथे अडचणी आल्या तिथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोन केले. अशा प्रकारे 2-3 प्रकल्प यशस्वी झाले. परंतु कायदा, शासन निर्णय होणे गरजेचे होते. यासाठी गोरेगाव येथे हौसिंगची परिषद घेतली. त्या परिषदेत तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 18 मागण्या केल्या. त्यापैकी 16 मागण्या मान्य करत त्याचे शासन निर्णयही जारी केले व या स्वयं पुनर्विकासाला खरी गती मिळाली. त्यामुळे ही योजना स्थिरावल्याचेही दरेकर म्हणाले.

तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. त्याला मंत्रिपदाचा दर्जाही दिला आहे. नुकतीच म्हाडा कार्यालयात सिडकोचे प्रश्न सोडविण्याबाबत बैठक पार पडली. नवी मुंबईत स्वयं पुनर्विकास योजना राबविण्यासाठी 90-95 टक्के सिडकोच्या अधिकाऱ्यांनीही मान्यता दिली आहे. या बैठकीचे मिनिट्स सरकारला जाणार असून नवी मुंबईकरांसाठी चांगला सकारात्मक निर्णय होणार आहे. चांगले काम हातात घेतले तर टप्प्याटप्प्याने यश मिळते. आपणच आपला विकास करून मोठी जागा मिळवायची. यासाठी अनेक सोसायट्यांनी पुढे आले पाहिजे. जी मदत, सहकार्य लागेल ती निश्चितपणे प्राधिकरणाच्या माध्यमातून करू, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी दिला.

दरम्यान, महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदी आमदार प्रविण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने नवी मुंबई को-ऑप हौसिंग फेडरेशनच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कारही करण्यात आला.

शरद पवारांनाही स्वयं पुनर्विकासाचे कुतूहल

दरेकर म्हणाले की, स्वयं पुनर्विकास हे महाराष्ट्रात क्रांतिकारी पाऊल आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी गेलो असता तिथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जवळ बोलावून स्वयं पुनर्विकास, त्याची प्रक्रिया आणि लोकांना होणाऱ्या फायद्याबाबत विचारणा केली. त्यांना मी सर्व समजावून सांगितले. त्यांनी पुस्तिका पाठवण्याचे सांगितले असता मी स्वतःच पुस्तिका घेऊन येईन असे म्हटले. एवढे कुतूहल स्वयं पुनर्विकासविषयी लोकांना आहे. विकासकाशिवाय सोसायटी उभी राहते व सर्वसामान्यांना मोठे घर मिळते हा हौसिंग सेक्टरमधील चमत्कार असल्याचेही दरेकर म्हणाले.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Embed widget