एक्स्प्लोर

मोठी बातमी! नवी मुंबईत 3 मजली इमारत कोसळली; बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू, जेसीबीनं हटवला जातोय मलबा

Navi Mumbai: नवी मुंबईत एक तीन मजल्यांची इमारत कोसळल्यानं संपूर्ण शहर हादरलं आहे. नवी मुंबईतील शहाबाज गावातील 3 मजल्यांची बिल्डिंग पत्त्यासारखी कोसळली आहे.

Navi Mumbai Building Collapsed : नवी मुंबई : आजची सकाळ महाराष्ट्राला (Maharashtra News) हादरवणारी ठरली आहे. नवी मुंबईत (Navi Mumbai) एक 3 मजल्यांची बिल्डिंग कोसळली (Building Collapsed) आहे. पहाटे सर्वजण साखर झोपेत असतानाच अचानक बिल्डिंग जमिनदोस्त झाली. सुरुवातीला अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, त्यानंतर ढिगाऱ्याखाली दोघे अडकले असून इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. बचाव पथकाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखाळी अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर, अद्याप एकाचा शोध सुरू आहे. 

नवी मुंबईत (Navi Mumbai) एक तीन मजल्यांची इमारत कोसळल्यानं संपूर्ण शहर हादरलं आहे. नवी मुंबईतील शहाबाज गावातील 3 मजल्यांची बिल्डिंग पत्त्यासारखी कोसळली आहे. बेलापूर विभागातील शहाबाज गावातील इंदिरा निवास जी प्लस 3 मजली इमारत पहाटे कोसळली. यामध्ये तीन नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत होती. दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. 

बिल्डिंगला अगोदर हादरे बसले त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक बाहेर पडले मात्र तीन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती समोर आली होती. घटनास्थळी पोलीस प्रशासन अग्निशमन दलाचे जवान पालिकेचे कर्मचारी अधिकारी दाखल झाले असून दोघांना बाहेर काढण्यात आलं असून एकाचा शोध अद्याप सुरू आहे.

प्रत्यक्षदर्शी आणि इमारतीतील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास बिल्डिंग कोसळली. पत्त्यासारखी बिल्डिंग जमिनदोस्त झाल्याचं पाहायला मिळाली. बिल्डिंगला अगोदर हादरे बसले, त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक बाहेर पडले. मात्र, दोन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती मिळाली. 

दुर्घटनेची बातमी मिळताच, पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, पालिकेचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोघांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. 

नेमकं घडलं काय? 

बेलापूर सेक्टर 19 शहाबाज गावातील इंदिरा निवास मधील तीन मजली इमारत कोसळली आहे. ही इमारत 2013 मध्ये बांधण्यात आली होती. कोसळलेल्या इमारतीमध्ये 3 गाळे आणि 17 फ्लॅट्स होते. पहाटे अचानक इमारतीला हादरा बसल्यानंतर नागरिक घाबरून घराबाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आतापर्यंत इमारतीत राहणारी 40 लोक आणि 13 मुलं सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. तर, ढिगाऱ्याखालून दोघांना बाहेर काढण्यात आलं आहे. दोघेही सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. तर अद्याप एक व्यक्ती बेपत्ता असून तिचा शोध सुरू आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक

व्हिडीओ

Sunil Shelke On NCP : सुनेत्रा वहिनींनी विलीनीकरण करायचं म्हटलं तर माझा पाठिंबा असेल
Dhairyasheel Mohite Patil : खासदार धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवर भडकले
Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
Embed widget