एक्स्प्लोर
लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या टेम्पोचा अपघात, दोघांचा मृत्यू
नाशिक-मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे गावाजवळ टेम्पो पलटी होऊन नवरदेवासह 40 जण जखमी झाले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
![लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या टेम्पोचा अपघात, दोघांचा मृत्यू two deaths in Tempo accident on mumbai nashik highway latest update लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या टेम्पोचा अपघात, दोघांचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/19223417/accident-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : नाशिमध्ये लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झाल्यानं माळी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नाशिक-मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्हे गावाजवळ टेम्पो पलटी होऊन नवरदेवासह 40 जण जखमी झाले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज (मंगळवार) सकाळी पाथर्डी फाटा परिसरातून असवलीकडे माळी कुटुंब वऱ्हाड घेऊन निघाले. दुपारी 12च्या सुमारास वाडीवऱ्हेजवळ पोहोचताच चालकाचं टेम्पोवरील नियंत्रण सुटलं आणि टेम्पो पलटी होताच सर्व प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. ज्यात लहान मुलांचाही समावेश होता.
स्थानिक आणि नागरिकांच्या मदतीनं जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपचारादरम्यान कार्तिक माळी या 5 वर्षाच्या मुलाचा आणि एका 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)