एक्स्प्लोर
दोन तरुणांच्या मृत्यूच्या धक्क्यानं शेजारच्या व्यक्तीचा मृत्यू
नाशिक : नाशिकमध्ये अपघातात शेजारी राहणाऱ्या युवकांचे निधन झाल्याचं समजताच एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी निफाडमधील दोन तरुणांचा कार अपघातात मृत्यू झाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे ही बातमी कळताच शेजारच्या व्यक्तीचाही हृद्यविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे.
निफाडमधल्या कसबेसुकेने गावातली बुधवारी संध्याकाळ कारचा अपघात झाला होता. भरधाव अल्टो कारचा हॅंडब्रेक दाबल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. अपघातात सागर वाघ (वय 25) आणि रवींद्र पैठणे (वय 17 वर्ष) या दोघांचा मृत्यू झाला होता.
नाशिकमधील या धक्कादायक घटनेमुळे एकाचवेळी तिघांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबियांवर आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement