एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Matrize)
नाशिकच्या देवळाली कॅम्प आर्टिलरी सेंटरमध्ये हेरगिरी केल्याचा संशयावरुन एकाला अटक
लष्करी हद्दीतील सैनिकी हॉस्पिटल परिसरात एक महिन्यापासून तो काम करत होता. लष्करी जवानांनी तपासणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये फोटो आढळून आले आहेत.
नाशिक : देवळाली कॅम्प आर्टिलरी सेंटरमध्ये हेरगिरी केल्याचा संशयावरुन एका युवकाला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आर्टिलरी सेंटरचे फोटो व्हिडीओ पाठवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हेरगिरीच्या संशयाने खळबळ उडाली आहे.
संजीव कुमार असं अटक केलेल्या 21 वर्षीय परप्रांतीय युवकाचं नाव आहे. संजीव कुमार मुळचा बिहारचा आहे. संजीव कुमार हा रोजंदारीवर काम करणारा मजूर आहे. लष्करी हद्दीतील सैनिकी हॉस्पिटल परिसरात एक महिन्यापासून तो काम करत होता. लष्करी जवानांनी तपासणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये फोटो आढळून आले आहेत.
त्यानंतर अधिक तपास केला असता त्याने एका व्हॉट्सअॅप नंबरवर फोटो पाठवले असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी या तरुणाविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement