एक्स्प्लोर
Advertisement
तुकाराम मुंढेंची धास्ती, नाशिक मनपात स्थायी समिती अध्यक्ष मिळेना!
प्रशासनाला कामाला लावल्यानंतर तुकाराम मुंढेंचा दरारा आता स्थायी समितीतही पाहायला मिळाला.
नाशिक : तुकाराम मुंढे यांनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्र सांभाळल्यापासून त्यांच्या कामकाजाच्या शैलीचीच चर्चा आहे. महापालिकेतील प्रशासनाला कामाला लावल्यानंतर तुकाराम मुंढेंचा दरारा आता स्थायी समितीतही पाहायला मिळाला.
मलईची खुर्ची असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अनेक सदस्य आता अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसल्याची माहिती आहे. याला कारण ठरलेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे.
तुकाराम मुंढे यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ आणि कामाची पद्धत पाहता स्थायी समिती अध्यक्षपदासाठी कुणी नेता तयार नाही, अशी चर्चा सध्या महापालिका आवारात सुरु आहे.
दरम्यान, आज स्थायी समितीच्या आठ सदस्यांना चिठ्ठी पद्धतीने घरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यात भाजपचे 4 तर शिवसेनेचे 2 आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :
कागदी घोडे नाचवू नका, रिझल्ट द्या, तुकाराम मुंढेंची अधिकाऱ्यांना तंबी
नाशिक महापालिकेतून देवांचे फोटो हटवा, तुकाराम मुंढेंचे आदेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement