Nashik Tree Cutting: 'जागा उपलब्ध असताना वृक्ष तोड का करावी? महायुतीमध्ये जरी असलो तरी....', तपोवनातील वृक्षतोडीवरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाणांची रोखठोक भूमिका
Nashik Tree Cutting: आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Arvind Jagtap on Nashik Tree Cutting: नाशिकमधील (Nashik) तपोवन (Tapovan) परिसरातील साधुग्रामच्या (Sadhugram) जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात (Nashik Tree Cutting) पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमींचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. या मुद्द्यावर राजकीय नेते, सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून याबाबत आवाज उठवत आहेत. याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सुरज चव्हाण यांनी म्हटलंय की, तपोवन येथे कुंभमेळ्याच्या निमित्ताने वृक्षतोड करण्याचा काहींची मानस आहे, तपोवन तोडून भाविकांची सेवा करण्याचा काहींचा मानस आहे. काळाची गरज पाहता वृक्षतोड झाली पाहीजे नाही. ३०-४० किमी चालून लोक कुंभमेळाव्यात शाहीस्नान करत होते हे आम्ही पाहिले आहे. जागा उपलब्ध असताना वृक्ष तोड का करावी? हा प्रश्न आहे. वृक्ष तोड थांबवावी ही आमची भूमिका आहे, वृक्षप्रेमी म्हणून अनेक लोक बोलत आहेत, महायुतीमध्ये जरी असलो तरी जरी काही असले तर आम्ही बोलण्याची ताकद ठेवतो, सरकारने जनतेसाठी वृक्षप्रेमींचा विचार करावा असंही त्यांनी म्हटलंय
तपोवनचा शब्दशः अर्थ ध्यान आणि तपश्चर्यासाठी राखून ठेवलेला परिसर
त्याचबरोबर त्यांनी एक सोशल मिडीया पोस्ट देखील लिहली आहे. त्या पोस्टमध्ये सुरज चव्हाण यांनी म्हटलंय की, "तपोवनचा शब्दशः अर्थ ध्यान आणि तपश्चर्यासाठी राखून ठेवलेला परिसर.पंचवटीच्या पुढे तपश्चर्येसाठी असा परिसर आहे म्हणून त्याला तपोवन असे नाव पडले. ऋषीमुनी हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात ध्यान करत असत. हिरवीगार झाडं असलेला हा परिसर तोडण्याचा घाट सत्तेतेल्या काही लोकांनी घातला आहे.खरं तर जवळच पर्यायी जागा उपलब्ध असताना वृक्ष तोडून त्याच ठिकाणी व्यवस्था करण्याचा अट्टहास का ? हजारो किलोमीटर वरून येणारे भाविक दहा,पंधरा किलोमीटर अंतरावर राहू शकतात चालत जाऊन स्नान करू शकतात.प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळाव्यात अनेक लोक 30 किलोमीटर पायी जाऊन शाहीस्नान केलेले आहेत.मग आपल्या इकडेच दहा,पंधरा वर्षीची जुनी वृक्ष तोडून तपोवनातच व्यवस्था का करावी वाटतेय ? तपोवनातील वृक्ष तोडून त्याबदल्यात दुसरीकडे तेवढीच नवीन वृक्ष बाहेरून आणून का लावू असं गिरीष महाजनजी म्हणतायत ? आहेत ती झाडं जपायची सोडून जुनी तोडायची आणि दुसरीकडे नवीन झाडं लावायची हा कार्यक्रम कशासाठी ? वृक्ष प्रेमी म्हणून सरकारला एवढीच विनंती आहे या वृक्षतोडीचा सहानुभूती पूर्वक विचार करावा", असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
तपोवनचा शब्दशः अर्थ ध्यान आणि तपश्चर्यासाठी राखून ठेवलेला परिसर.पंचवटीच्या पुढे तपश्चर्येसाठी असा परिसर आहे म्हणून त्याला तपोवन असे नाव पडले. ऋषीमुनी हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात ध्यान करत असत.
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) December 3, 2025
हिरवीगार झाडं असलेला हा परिसर तोडण्याचा घाट सत्तेतेल्या काही लोकांनी घातला…
अजित पवारांची पोस्ट काय?
तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहीलं, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, अशी पोस्ट अजित पवारांनी त्यांच्या सोशल मिडीयावरून लिहली आहे.
तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहीलं, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 3, 2025

























