एक्स्प्लोर
नाशकात संपत्तीसाठी आई आणि बहिणीकडून भावाची हत्या
नाशिक : नाशिक रोड परिसरात डोक्यात दगड घालून हत्या झालेल्या संतोष पाटील यांच्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे संतोषच्या सख्ख्या बहीण आणि आईनेच हा कट रचल्याचं माहिती आहे.
संपत्तीच्या हव्यासातूनच मायलेकींनी आपल्या भावाला संपवलं. मावस भावाच्या मदतीने दोघांना 40 हजार रुपयांची सुपारी त्यांनी दिली होती. यासाठी बहिणीने आईलाही फुस लावल्याचं म्हटलं जातं. या प्रकरणी तीन आरोपींना नाशिक रोड पोलिसांनी जेलरोड परिसरातून शनिवारी रात्री अटक केली.
7 मार्चला रात्री संतोष पाटीलची नाशिकरोड परिसरातील दसक येथे गळा आवळून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement