एक्स्प्लोर
डिझेल अभावी नाशिक एसटी महामंडळाची सेवा ठप्प; बसच्या 100 फेऱ्या रद्द
नाशिकमध्ये डिझेल अभावी एसटी महामंडळाची सेवा ठप्प झालेली आहे. नाशिकच्या आगार क्रमांक 1 मध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचं कळतंय. यामुळे एसटीच्या या आगारातल्या 100 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
नाशिक : डिझेल अभावी एसटी महामंडळाची सेवा ठप्प झाली असून नाशिक आगारातील 100 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. प्रवाशांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. नाशिकच्या आगार क्रमांक 1 मध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याची माहिती मिळत आहे. यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या बस आगारातच खोळंबून आहेत.
नाशिकच्या आगार क्रमांक 1 मध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने पहाटेपासून बसफेरी सुरु झालेल्या नाहीत. परिणामी कामगारांच्या हाताला काहीच काम नसल्यानं नाईलाजास्तव त्यांच्यावर रजा घेण्याची वेळ आली आहे. डिझेल तुटवड्यामुळे एसटीच्या जवळपास 100 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
प्रवाशांना नाहक त्रास -
डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने पहाटेपासून एकही बस आगार क्रमांक एकमधून बाहेर पडली नाही. त्यामुळे रात्रभर गाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास झाला आहे. एसटीच्या जवळपास 100 फेऱ्या रद्द झाल्याने नाशिक जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील प्रवाशांना याचा जास्त फटका बसला आहे. बस रद्द झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. याचा मनस्ताप तर झालाच शिवाय खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने त्याचा परिणाम खिशावरही झाला आहे.
एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्यासाठी घाट -
सध्या देशभरात अनेक सरकारी संस्थाचे खासगीकरण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याच धर्तीवर नाशिक एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्यासाठी जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातं असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, अचानक डिझेलचा तुटवडा का निर्माण झाला? यावर एसटी महामंडळाने प्रतिक्रिया दिलेली नाही.
एसटीचं राज्य शासनात विलिनीकरण -
एसटीचं राज्य शासनात विलिनीकरण करावं, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सेवा सुविधा मिळाव्यात, या मागण्यांसाठी एसटीची कनिष्ठ वेतन श्रेणी संघटना मोर्चा काढणार आहे. 18 डिसेंबरला नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनावेळी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. एसटीच्या कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेच्या वतीने 2016 च्या हिवाळी अधिवेशनावेळी राज्य शासनातील विलिनीकरण आणि अन्य काही मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या संघटनेचे राज्यभरात 30 हजार सदस्य असल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी केला आहे.
वाचा - एसटीचं राज्य शासनात विलिनीकरण करा, कनिष्ठ वेतन श्रेणी संघटना मोर्चा काढणार
ST Workers Salary | तोट्यात गेलेल्या एसटीकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
विश्व
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement