एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दंड म्हणून 10 हजारांची चिल्लर सोपवली, मोजता मोजता अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ
नाशिकरोड परिसरात एका वाईनच्या दुकानात कारवाईसाठी गेलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना, व्यावसायिकाने चक्क दहा हजार रुपयांची चिल्लर दिली.
नाशिक: प्लास्टिक बंदीच्या निर्णयावरुन मनपा कर्मचारी आणि व्यवसायिकांमध्ये खटके उडू लागले आहेत. कारवाईला कंटाळलेले व्यावसायिक कारवाई टाळण्यासाठी आता वेगवेगळे बहाणे शोधत आहेत.
त्यातूनच नाशिकरोड परिसरात एका वाईनच्या दुकानात कारवाईसाठी गेलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना, व्यावसायिकाने चक्क दहा हजार रुपयांची चिल्लर दिली. संबंधीत व्यावसायिकाला याआधी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. पुन्हा त्याच्याकडे प्लास्टिक सापडल्याने दंडाची रक्कम दुप्पट होऊन 10 हजार झाली.
मात्र हेतूपुरस्सर कारवाई केली जात असल्याचा समज झाल्यानं, या व्यावसायिकाने मनपा कर्मचाऱ्यांची खोड मोडण्यासाठी अधिकाऱ्यांच्या हातात चिल्लर ठेवली. मात्र एव्हढी रक्कम मोजता मोजता त्यांच्या नाकीनऊ आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
Advertisement