एक्स्प्लोर
गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नगरसेवक पवन पवारचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिक : नाशिकमधील गुन्हेगारी पार्श्वभूभी असलेला अपक्ष नगरसेवक पवन पवारने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नाशिकच्या आगामी पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने पवन पवारला पक्षात घेतलं आहे. पवन पवार याच्यावर पोलीस कृष्णकांत बिडवे यांच्या हत्याकांडतील प्रमुख आरोपी आहे. व्यावसायिकांकडून खंडणी मागितल्याचे दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांशी पंगा घेण्यासाठी पवन पवारला पक्षात घेतल गेलं, अशी चर्चा नाशिककरांमध्ये सुरु आहे. नगरसेवक पवन पवारवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे :
- पोलीस कृष्णकांत बिडवे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी
- व्यावसायिकांकडून खंडणी मागितल्याचे दोन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
- दुहेरी हत्याकांडातल्या आरोपींना मदत केल्याने एसपींकडून कसून चौकशी
- पोलीस कृष्णकांत बिडवे हत्याकांडप्रकरणी मोक्का अंतर्गत गंभीर कारवाई
Before You Go
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
सोलापूर
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















