एक्स्प्लोर
'ब्राह्मण मुख्यमंत्री पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. पंचांग बघूनच ते मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असं वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केलं.

नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. पंचांग बघूनच ते मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असं वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केलं. ते नाशिकमध्ये एबीपी माझाशी बोलत होते. राहू कोण, केतू कोण हे बघूनच मुख्यमंत्री मूहूर्त काढतील अशी पुस्तीही त्यांनी जोडली. गुलाबराव पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री महोदय ब्राह्मण आहेत. पंचागाच्या आधारे ते कधी मुहूर्त काढतात, यावर आता मंत्रिमंडळ विस्तार अवलंबून आहे. त्यांना लक्षात येईल राहू कोण, केतू कोण, त्यावर सर्व अवलंबून आहे. मागच्या विस्तारात माझा मंत्रिमंडळात समावेश झाला. आता त्यांच्या पक्षातील, त्यांच्या डोक्यातील कोण आहेत हे पाहावं लागेल” पेट्रोल दरवाढीवरुन निशाणा यावेळी गुलाबराव पाटील यांनी पेट्रोल दरवाढीवरुनही सरकारवर निशाणा साधला. आधी पेट्रोल पंपावरच्या पोस्टरवर मोदींसोबत वृद्ध स्त्री असायची, आता मॉडेल दिसते असं पाटील म्हणाले. पेट्रोलचे दर गगनाला भिडले तरी लोक भाजपलाच पसंत करतायत अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.
आणखी वाचा























