एक्स्प्लोर
नाशिक मनपा पोटनिवडणूक : प्रतिष्ठेच्या लढाईत मनसेचा विजय
मनसेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्यासाठी ही पोटनिवडणूक झाली.
![नाशिक मनपा पोटनिवडणूक : प्रतिष्ठेच्या लढाईत मनसेचा विजय Nashik bypoll results 2018 : MNS retains ward no 13 (c), Vaishali Bhosale wins नाशिक मनपा पोटनिवडणूक : प्रतिष्ठेच्या लढाईत मनसेचा विजय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/07124305/MNS.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 (क) च्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाजी मारली आहे. प्रतिष्ठेच्या लढाईत मनसेच्या वैशाली भोसले यांचा विजय झाला आहे.
प्रभाग क्रमांक 13 (क) च्या पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी (6 एप्रिल) रोजी मतदान झालं होतं. तर आज निकाल जाहीर करण्यात आला.
मनसेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्यासाठी ही पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीसाठी मनसेने भोसले यांच्या घरातच वैशाली भोसले यांना उमेदवारी दिली. तर शिवसेनेने मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या स्नेहल चव्हाण आणि भाजपने विजया लोणारी यांना उमेदवारी तिकीट दिलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेना, मनसे आणि भाजप या प्रमुख पक्षामध्ये तिरंगी लढत झाली होती.
संबंधित बातमी
नाशिक मनपा पोटनिवडणुकीत मनसेला काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
क्रीडा
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)