एक्स्प्लोर

ओझर परिसरात 53 लाखांचा अवैध मद्यसाठा पकडला, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी

राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या पथकाला अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.

  मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक, नाशिक विभागाच्या पथकाने मुंबई- आग्रा माहामार्गावर सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेले तसेच गोवा राज्यात निर्मीत व गोवा राज्यातच विक्री करता असलेला  विदेशी मद्याचा ट्रक पकडून त्याच्यावर कारवाई केली. 

राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या पथकाला अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने ओझर जवळील मुंबई आग्रा महामार्गावरील कारभारी हॉटेल समोर, दहावा मेल, ओझर येथे सापळा रचला. यावेळी या मार्गावरून सहाचाकी ट्रक (एम एच -43-वाय -9251) संशयास्पदरित्या जात असता त्याला अडवून तपासणी करण्यात आली. 

दरम्यान तपासणी केली असता ट्रकमध्ये 5 हजार 400 लिटर  महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेले तसेच गोवा राज्यात निर्मीत व गोवा राज्यातच विक्रीकरता असलेला  विदेशी मद्यसाठा आढळून आला.  पथकाने लागलीच हा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला मुद्देमाल हा 53 लाख 88 हजार रुपयांचा असून संशयित बबलू हरभजन यादव यास अटक करण्यात आली आहे. 

या कारवाई करीता निरीक्षक कळवण विभाग  एस. के. सहस्त्रबुध्दे, दुय्यम निरीक्षक आर. एम. डमरे व त्यांचे पथक  तसेच निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.03.  एम. एम. कावळे व त्यांचे पथक  यांनी यशस्वीरित्या पार पडली. याप्रकरणी पुढील तपास  दुय्यम निरीक्षक, विभागीय भरारी पथक, नाशिक विभाग ए. जी. सराफ करीत आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे आवाहन 
 
अवैध मद्य निर्माती, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र. 18008333333 व व्हॉटस अॅप क्र. 8422001133 तसेच दुरध्वनी क्र. 0253/2319744  वर संपर्क साधावा.

संबंधित बातम्या :

Nashik Crime : धक्कादायक! नाशिकच्या माडसांगवीत 363 क्‍विंटल अनधिकृत धान्यसाठा जप्त, तहसीलदारांकडून गोदाम सील 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Kavya Maran: कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Shivsena Candidate List : 'या' जागांवरून महायुतीत तिढा; शिंदेंचे उमेदवार ठरलेRashmi Barve : काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बादZero Hour : विद्यमान खासदारांना डच्चू मिळाल्यानं मविआ-महायुतीमध्ये नाराजांची फौज |Lok Sabha ElectionMVA Loksabha Electoion 2024 : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम; 31 मार्चला दिल्लीत बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Kavya Maran: कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Embed widget