एक्स्प्लोर

Nashik Crime : धक्कादायक! नाशिकच्या माडसांगवीत 363 क्‍विंटल अनधिकृत धान्यसाठा जप्त, तहसीलदारांकडून गोदाम सील 

Nashik Crime : नाशिक (Nashik) जवळील माडसांगवी येथील एका गोदामात 363 क्‍विंटल धान्याचा साठा (Food) असल्याचे आढळून आला असून संबंधित गोदाम तहसीलदार दौंडे (Nashik Tahsildar) यांनी सील केले आहे. 

Nashik Crime : नाशिक जवळील माडसांगवी येथील एका गोदामात 363 क्‍विंटल धान्याचा साठा असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा साठा अनधिकृत असल्याची तक्रार प्राप्त होताच नाशिकचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी तात्काळ येथे दाखल होत पाहणी केली असता विनापरवाना त्याची साठवणूक केली असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आल्याचे स्पष्ट झाले. यामुळे संबंधित गोदाम तहसीलदार दौंडे यांनी सील केले आहे. 

जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांच्याकडे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुरवठा अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले. तहसीलदार अनिल दौंडे यांनी तातडीने पथकासह माडसांगवी येथे गोदामावर छापा टाकत हा धान्यसाठा जप्त केला आहे. प्राथमिक माहितीनुसार नरसिंह ट्रेडिंग म्हणून देशमुख नामक व्यक्तीचे येथे गोदाम आहे. या गोदामात 175 क्विंटल गहू, 188 क्विंटल तांदूळ असा 363 क्विंटल धान्य साठा आढळून आला. या धान्याच्या पोत्यांवर मध्य प्रदेश, महाराष्ट्र शासनाचा उल्लेख असून काही पोती रेशनची असल्याचेही निदर्शनास आले आहे. 

दरम्यान सदर धान्यसाठा कुठून आला? रेशन दुकानांशी काही संबंध आहे का? संबंधित व्यावसायिकाकडे परवाना आहे का? या सर्व बाबींची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात यापूर्वी अशा रीतीने धान्याचा काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे फहीम शेख, शहर अध्यक्ष ऋषिकेश वर्मा यांच्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे तहसीलदार दौंड यांनी सांगितले. 

धान्यांच्या पोत्यांवर महाराष्ट्र-मध्यप्रदेशचा उल्लेख 
दरम्यान संशयास्पद गोदामात 350 गव्हाचे कट्टे आणि 376 तांदळाचे कट्टे असा 363 क्विंटल धान्य साठा आढळला जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 च्या कलम 3 नुसार सदरच्या गोदामाला विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यातील काही धान्याचे वर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारचा उल्लेख आढळून आला दरम्यान तपास सुरू असून त्यानंतर अधिक माहिती समोर येईल, अशी माहिती नाशिकचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी सांगितले. 

तक्रारीकडे दुर्लक्ष
एकूणच गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या मात्र,  तक्रारीकडे जिल्हा पुरवठा अधिकारी कर्मचारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच धान्य घोटाळा सुरू असल्याचे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाने रेशन माफियांची ही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होऊन ही कारवाई केली असून संबंधित संशयितास पोलीसांनी लाखो रूपयाच्या मुद्देमालासहीत ताब्यात घेतले आहे..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?Zero Hour on Chatarapati Sambhajingar:छत्रपती संभाजीनगर बनतंय कचरा किंग, महापालिका तोडगा कधी काढणार?Anand Paranjape on Raj Thackeray | राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी, परांजपेंची टीकाSomnath Suryawanshi Mother|मला न्याय मिळाला नाही मी इथेच जीव देते, सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा आक्रोश

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget