एक्स्प्लोर
शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; नांदगावमध्ये विद्यार्थी, पालकांचा पंचायत समितीवर मोर्चा
नांदगावमधील पांझणदेव येथील शाळकरी विद्यार्थी आणि पालकांनी पंचायत समितीवर शाळेत कायम स्वरुपी शिक्षक मिळावा यासाठी मोर्चा काढण्यात आला. सहावी आणि सातवीच्या वर्गांसाठी शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होतेय.

नाशिक : जिल्ह्यातील नांदगावमध्ये शाळकरी विद्यार्थी आणि पालकांनी मंगळवारी पंचायत समितीवर मोर्चा काढला. शाळेला कायम स्वरुपी शिक्षक मिळावे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. पांझणदेव गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळेसाठी फक्त तीनच शिक्षक आहेत. तर सहावी आणि सातवीच्या वर्गांसाठी शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होतेय. शाळेला कायम स्वरुपी शिक्षक मिळावे यासाठी आज नांदगावच्या पांझणदेव येथील ग्रामस्थ आणि शाळतरी विद्यार्थ्यांनी नांदगाव पंचायत समितीवर मोर्चा काढत धरणे धरले. जिल्हा परिषदेची पांझणदेव येथे पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. या ठिकाणी केवळ तीनच शिक्षक आहेत. सहावी आणि सातवीसाठी शिक्षकच नसल्याने गेल्या वर्षापासून शिक्षक मिळावे, अशी मागणी गावच्या शाळा व्यवस्थापनाने सातत्याने केली. मात्र, वर्ष उलटूनही याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने अखेर विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी पंचायत समितीवर मोर्चा काढत धरणे धरले. याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक नेमण्यात येत असल्याचं पत्र दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आलंय. मात्र, ही अडचण सोडवली नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये आता वॉटर बेल! शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला - राज्याचं आर्थिक धोरण ठरवताना कोट्यवधींचा निधी शिक्षण विभागावर खर्च केला जातो. खेड्यापाड्यातील मुलांपर्यंत शिक्षणांची गंगा पोहचावी म्हणून शासन स्तरावर विविध योजनाही राबवल्या जातात. सरकारने तर प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलंय. मात्र, शिक्षकच शिकवायला नसतील तर या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधांतरीच म्हणावं लागेल. मागील फडणवीस सरकारने पटसंख्याअभावी अनेक शाळा बंद केल्या. राहिलेल्या विद्यार्थ्यांना जवळच्याच शाळेमध्ये समाविष्ठ करण्यात आले. मात्र, प्रत्येक गावात दळणवळणाची व्यवस्था असेलच असे नाही. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळा गावाबाहेर गेली म्हणून शिक्षणाला मुकावे लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशातच आता शाळा आहे, मात्र शिकवायला शिक्षकच नाही. त्यामुळं शिक्षकाअभावी नांदगावच्या पांझणदेव येथील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे, असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. Cattle School | मराठवाड्यातील सव्वाशे गोवंश शाळा संकटात | ABP Majha
आणखी वाचा























