थरारक व्हिडीओ, नाशिकमध्ये बिबट्याचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला
दिवसाढवळ्या मानवीवस्तीत बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. जवळपास अर्धा ते एक तास बिबड्या परिसरात फिरत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.
नाशिक : नाशिक शहरात पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालं आहे. गंगापूर रोडवरील आर्किटेक्ट कॉलनी परिसरात बिबट्या नजरेस पडला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सध्या घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले. बिबड्याला जेरबंद करण्यादरम्यान नाशिक वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवला
बिबट्याच्या हल्ल्यात कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. उपचारासाठी कर्मचाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परिसरात बिबट्या घुसल्याच्या बातमीनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे परिसरातील लोकांना गर्दी न करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे गंगाखेड रोड परिसरात बिबट्याच्या दर्शनाने दहशत पसरली आहे.
VIDEO | नाशिकमध्ये बिबट्याचा थरार | नाशिक | एबीपी माझा
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सध्या घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत. गेल्या काही तासापासून बिबट्याचा जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मात्र दिवसाढवळ्या मानवीवस्तीत बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. जवळपास अर्धा ते एक तास बिबड्या परिसरात फिरत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.
पाहा व्हिडीओ