(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ईगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण;' अभिनेत्री हीना पांचाळच्या अडचणीत वाढ
ईगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी 25 जणांना अटक केली होती. यात हीना पांचाळसह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांचा समावेश होता.
नाशिक : मराठी बिग बॉसची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री हीना पांचाळच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये पोलिसांनी हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला होता. या रेव्ह पार्टीमधून पोलिसांनी हीना पांचाळसह 25 जणांना अटक केली आहे. सोमवारी रेव्ह पार्टीतील 25 आरोपींना इगतपुरी न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन कामगार, एक छायाचित्रकार आणि एक स्वयपाकी यांना जामीन देण्यात आला आहे. तर हीनासह 20 जणांचा जामीन फेटाळत त्यांना 7 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
इगतपुरीतील स्काय ताज व स्काय लगून या अलिशान बंगल्यात 26 जून रोजी मध्यरात्री रंगलेल्या रेव्ह पार्टीवर ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने छापा टाकत ही रेव्ह पार्टी उधळून लावली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी 25 जणांना अटक केली होती. यात हीना पांचाळसह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर यांचा समावेश होता.
ड्रग्सच्या वापराबाबत पोलीस सध्या सखोल तपास करत असून पार्टीसाठी वापरलेले 2 बंगलेही त्यांनी सील केले आहेत. विशेष म्हणजे इगतपुरीत असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून पोलिसांकडून सर्व दक्षता घेतली जात असून या परिसरातील रिसॉर्ट्स, हॉटेल्सलाही नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
Heena Panchal : ग्लॅमरस हिना पांचाळ... नेमकी आहे तरी कोण? नाशिकमधील रेव्ह पार्टीतून अटकेनंतर चर्चेत
काय आहे प्रकरण?
पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधील ईगतपुरीचे निसर्गसौंदर्य पावसाळ्यात अधिकच उठून दिसते. त्यामुळे पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतात. खास करून विकेंडला इगतपुरीतील जवळपास सर्वच हॉटेल्स आणि रिसॉर्टची बुकिंग फुल असते. मात्र, याच परिसरातील स्काय ताज व्हिला आणि स्काय लगून व्हिलावर शनिवारी रात्री जे काही सुरु होते ते धक्कादायक होतं. या दोन ठिकाणी रेव्ह पार्टी सुरु होती, ज्यात 10 पुरुष आणि 12 महिला अशा एकूण 22 जणांचा समावेश होता. रविवारी पहाटे नाशिक ग्रामीण पोलिसांना याबाबत टिप मिळताच स्वतः पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आपल्या पथकासह इथे छापा टाकला. यावेळी काही महिला आणि पुरुष आक्षेपार्ह अवस्थेत इथे आढळून आले. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी अनेकांनी साऊथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत काम केलंय, काहीजण कोरिओग्राफर आहेत तर एक महिला ही परदेशी नागरिक आहे.
इगतपुरी रेव्ह पार्टीत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं
पियुष शेट्टीया, आरव शर्मा, विशाल मेहता, रोहित अरोरा, अकीब खान, वरुण बाफणा, करिश्मा, चांदणी भटिजा, श्रुती शेट्टी, रुचिरा नार्वेकर, विदेशी महिला अझार फारनुद, शनैया कौर, हिना पांचाल, अषिता, शिना, प्रिती चौधरी, कौशिकी